Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काँग्रेसने निष्ठावंतांना डावलून घराणे शाही चालवली लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांची टीका

  काँग्रेसने निष्ठावंतांना डावलून घराणे शाही चालवली लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांची टीका _अपक्ष उमेदवारी दाखल_ इदू पिंजारी फैजपूर (...

 काँग्रेसने निष्ठावंतांना डावलून घराणे शाही चालवली लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांची टीका

_अपक्ष उमेदवारी दाखल_



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

रावेर विधानसभा निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून ते यावेळी म्हणाले की मी गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा सक्रिय निष्ठावंत कार्यकर्ता असून सहा वेळा नगराध्यक्ष पद भूषविले असून सध्या नगराध्यक्ष आहे काँग्रेस पक्षा कडे उमेदवारीची मागणी केलेली होती मात्र त्यांनी मला डावलून कोणताही राजकीय अनुभव नसलेला उमेदवार धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली एका प्रकारे चौधरी परिवाराने घराणे शाही चालवली आहे माजी मंत्री कै. मधुकरराव चौधरी  यांच्या नंतर आमदार शिरीष चौधरी आणि आता धनंजय चौधरी असा वारसा चालवलेला आहे. असेही दारा मोहम्मद यांनी जोरदार टीका केली ते पुढे म्हणाले की धनंजय चौधरी हा नवखा उमेदवार आहे त्याच्याजवळ कोणताही राजकीय अनुभव नसून त्याने आजपर्यंत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अशी कोणतीही निवडणूक लढलेली नाही आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर यावल तालुक्यात गेल्या पाच वर्षात कोणतीही विकास कामे केलेली नाही ते पुढे म्हणाले की माझी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली असून मुस्लिम समाज व प्रत्येक  घटकाचे सामान्य जनतेचा उमेदवार आहे त्यांची उमेदवारी दाखल करते वेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

No comments