वेळुंजे फाटा ते हेदअंबा पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था वाहन चालक त्रस्त.. नाशिक प्रतिनिधी (संपादक:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील वेळुंजे...
वेळुंजे फाटा ते हेदअंबा पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था वाहन चालक त्रस्त..
नाशिक प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील वेळुंजे फाटा ते हेदअंबा हा रस्ता मंजूर झालेला असुन या रस्त्याकडे कंत्राटदारांकडून दुर्लक्ष होत आहे. वेळुंजे फाटा ते हेदअंबा या महत्त्वाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्याला लागून आठ ते नऊ गावे जोडलेले आहेत रस्त्याची दुरावस्था झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने जाण्या येण्यासाठी खूप वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे एसटी महामंडळाची बस बंद करण्यात आली आहे
चालकांना खड्डे चुकविता चुकविता वाहने समोरासमोर येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता जेव्हा होईल तेव्हा होईल पण सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा लोकसभा अध्यक्ष नाशिक जयवंत हागोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया-
हा रस्ता मंजुर असूनही कंत्राटदार काम चालू करत नाही कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे पीडब्ल्यूडी, तहसिलदार,आमदार यांना निवेदन देऊनही या रस्त्याची दखल घेतली जात नाही रस्ता खराब असल्यामुळे एसटी महामंडळाची बस बंद करण्यात आलेली आहे बस बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे :- अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाशिक लोकसभा अध्यक्ष जयवंत हागोटे
No comments