Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथील प्रविण वानखेडे यांना रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप प्राप्त दि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड,ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे मास्टर्स ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी याचे शिक्षण घेणार

  मोठा वाघोदा येथील प्रविण वानखेडे यांना रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप प्राप्त  दि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड ,  ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथ...

 मोठा वाघोदा येथील प्रविण वानखेडे यांना रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप प्राप्त  दि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे मास्टर्स ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी याचे शिक्षण घेणार   


             रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :-हेमकांत गायकवाड )

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेत असतांनाच वडिलांचे छत्र हरवलेल्या युवक प्रविण कल्पना सुभाष वानखेडे यांना रोटरी फौंडेशन यांची 2025 सालची रोटरी इंटरनॅशनल पीस फेलोशिप प्राप्त झाली आहे. या अंतर्गत ते फेब्रुवारी 2025 ते जून 2026, असे एकूण 17 महिने दि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड, ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे मास्टर्स ऑफ पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी याचे शिक्षण घेणार आहेत. या फेलोशिप अंतर्गत त्यांचा प्रवास, शिक्षण, राहणे, जेवण, रिसर्च, फिल्ड-वर्क आणि इतर असा साधारणतः 80 लाख रुपये खर्च रोटरी फौंडेशनतर्फे करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या फेलोशिप अंतर्गत आस्ट्रेलिया येथे शिक्षण घेणारे ते पहिले महाराष्ट्रीयन तर या वर्षी आस्ट्रेलियासाठी दक्षिण आशिया खंडातून निवडले गेलेले एकमेव विद्यार्थी आहेत. 

प्रविण यांचा जन्म सर्वसाधारण मजूर कुटुंबात झाला असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा व प्रकाश विद्यालय येथे झाले आहे. त्यांनतर त्यांनी जळगाव येथून बॅचलर ऑफ सोशल वर्क पदवी प्राप्त केली आणि अजीम प्रेमजी विश्वविद्यालयाची स्कॉलरशिप मिळवून बंगलोर येथून मास्टर्स इन डेव्हलोपमेंटचे पद्व्योत्तर शिक्षण घेतलेले आहे. सध्या ते पुणे येथे कम्युनिटी एंगेजमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असून जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत.या निवडीने त्याचे गावातून सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

No comments