अंतुर्ली येथून अंतुर्ली ते इच्छापुर पायी चुनरी यात्रेचे आयोजन संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक:- हेमकांत गायकवाड) सध्या न...
अंतुर्ली येथून अंतुर्ली ते इच्छापुर पायी चुनरी यात्रेचे आयोजन संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्राचे औचित्य साधत विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतुर्ली यांच्या वतीने अंतुर्ली ते इच्छापुर येथील इच्छादेवी मंदिरापर्यंत पायी चुनरी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अंतुर्ली येथील बजरंग चौकात असणाऱ्या बजरंग बलीच्या मंदिरात आरती करून चुनरी यात्रेला प्रारंभ करण्यात आला. हे चुनरी यात्रेचे चौथे वर्ष आहे ही चुनरी यात्रा बजरंग चौकातून निघून बस स्टँडकडून फिरून गुजरवाडा पाटील वाडया कडून बस स्टॅन्ड वरून इच्छापुर कडे रवाना झाली .या चुनरी यात्रेत अंतुर्ली गावातील प्रतिष्ठित नागरिक ,विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते व अंतुर्ली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments