Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवसेना उपनेते तथा धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरददादा कोळी यांच्या हस्ते कोळी महादेव जमातीच्या उपोषणाची सांगता

  शिवसेना उपनेते तथा धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरददादा कोळी यांच्या हस्ते कोळी महादेव जमातीच्या उपोषणाची सांगता प्रशासनाच्या नाकात दम आण...

 शिवसेना उपनेते तथा धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरददादा कोळी यांच्या हस्ते कोळी महादेव जमातीच्या उपोषणाची सांगता

प्रशासनाच्या नाकात दम आणणाऱ्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे उपोषण तात्पुरते स्थगित


अमोल बावस्कार वि.प्र. बुलढाणा 

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- घटनेच्या 342 व्या कलमानुसार आरक्षण असूनही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दिनांक 13 ऑगस्ट पासून कोळी महादेव जमातीने आमरण उपोषण, साखळी उपोषण परत आमरण उपोषण तसेच विविध आंदोलने करून आपले आंदोलन लक्षवेधी केले होते. आंदोलनात मुंडन आंदोलन दशक्रिया आंदोलन , रास्ता रोको, टॉवरवर चढून आंदोलन, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कशात महिलांचे ठिय्या आंदोलन तसेच जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा कोळी महादेव जमातीने पूर्णपणे प्रयत्न केला. प्रशासन अगदी जेरीस आणले होते. वेळोवेळी बैठका घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी प्रमाणपत्रा बाबतीत आश्वासन दिले होते . शिवसेना उपनेते तथा  धाडस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शरद दादा कोळी , स. पो. नि.  करुणाशिल तायडे यांच्या हस्ते आमरण उपोषण कर्ते मरु धाडे , निनु शिरसाठ यांना शीतपेय देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. हे आंदोलन तब्बल ५५ दिवस चालले.यावेळी संतप्त शरद दादांनी मलकापूर प्रशासनाला परिणाम भोगण्याचा इशारा दिला. या आंदोलनाला सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील ,  शिवसेना (उ बा ठा), आदिवासी कोळी महादेव जमातीचे अभ्यासक प्रा.बाळासाहेब बळवंतराव , दत्ता सुरवसे (सोलापूर), बुलढाणा शिवसेना  (उ बा ठा) वसंतराव भोजने उपस्थित होते. त्यावेळी संतप्त जमावाने प्रचंड घोषणा बाजी केली .उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी एस सपकाळ यांनी तर आभारप्रदर्शन पुरुषोत्तम झालटे यांनी केले.

No comments