adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलीसांनी 8लाखांचे वाहन 14लाखांचा अवैध गुटखासह 22लाखांचा मुद्देमाल केला जप्त दोघांना अटक

 रावेर पोलीसांनी  8 लाखांचे वाहन  14लाखांचा अवैध गुटखासह 22लाखांचा मुद्देमाल केला जप्त दोघांना अटक  रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी  (संप...

 रावेर पोलीसांनी  8 लाखांचे वाहन  14लाखांचा अवैध गुटखासह 22लाखांचा मुद्देमाल केला जप्त दोघांना अटक 


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील मध्यप्रदेश -महाराष्ट्र रावेर चोरवड चेकपोस्ट तपासणी नाका ठिकाणी वाहन तपासणी करत असतांना महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित   14 लाख रुपयांचा गुटख्यासह  8 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन रावेर पोलिसांनी पकडल्यानंतर गुटखा माफियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांवर रावेर पोलिस स्थानकात  गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही ना अटक करण्यात आली आहे.


सविस्तर असे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे घमासान सुरू आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने सर्वत्र नाकाबंदी केली जात असून वाहनांची कसून तपासणी चौकशी केली जात आहे दरम्यान आज रावेर तालुक्यातील चोरवड तपासणी नाका येथे नाकाबंदी करून तपासणी करीत असतांनाच एम.एच.04एचवाय 6515 महिंद्रा बोलेरो कंपनीची चारचाकी गाडी समोरुन येताना दिसली. कर्तव्यावर असलेल्या रावेर पोलिसांनी ती गाडी थांबवून तपासणी केली असताना, या बोलेरो पीक अप मालवाहू गाडीत महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला  14 लाखांचा सुगंधित सुपारी केसरयुक्त विमलपान मसाला गुटखा व तंबाकूजन्य गुटखा कट्ट्यात  सापडला.  या गुटख्याची वाहतूक करतांना वाहनातील  रिजवान शेख रऊफ (वय 28) आणि शेख शोयब शेख शरीफ (वय 27), दोन्ही राहणार छत्री चौक पठाण वाडी, फैजपुर ता. यावल, या दोघांना चारचाकी वाहनासह अटक केली व यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्यात वाहतूक प्रतिबंधित विक्रीसाठी बंदी असूनही ही वाहतूक करतांना आढळून आल्याने रावेर पोलीस स्थानकात त्यांचे विरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. पो. कां.संभाजी रघुनाथ बिजागरे यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्ह्याची नोंद दाखल करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात अन्नसुरक्षा आयुक्तांच्या अधिसूचना क्रमांक असुमा/सूचना 794/2018/7 दि.20/07/2018 नुसार हे अन्नपदार्थ सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रतिबंधीत करण्यात आले आहेत. 20/07/2018 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करीत आहेत. अटक केलेले दोन्ही आरोपींना रावेर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर अन्नपूर्णा सिंग, पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ संजय मेढे, पोकाँ विशाल पाटील, पोकाँ प्रमोद पाटील, विशाल पाटील, रविंद्र भांबरे, पो.कॉ संभाजी बिजागरे, यांच्या पथकाने ही कार्यवाई केली आहे.

No comments