adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा मतदार संघात ७० दिव्यांग व अति वयोवृद्ध व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क.. प्रशासनाचे आपुलकीच्या वागणूकीने मतदार राजाचे चेहऱ्यावर हास्य

  चोपडा मतदार संघात ७०  दिव्यांग व अति वयोवृद्ध  व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क..   प्रशासनाचे आपुलकीच्या वागणूकीने मतदार राजाचे चेहऱ्यावर ...

 चोपडा मतदार संघात ७०  दिव्यांग व अति वयोवृद्ध  व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क.. 

प्रशासनाचे आपुलकीच्या वागणूकीने मतदार राजाचे चेहऱ्यावर हास्य 


चोपडा,दि.१० (प्रतिनिधी) 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा विधानसभा मतदार  संघात आज दि.१०नोव्हेंबर २०२४ रोजी  दिवसभरातून १६ दिव्यांग  तर ५४अति वयोवृद्ध  व्यक्तींनी  गुप्त मतदान पध्दतीने मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात चोख कामगिरी निभावली आहे.जवळपास ३० गावांमध्ये पाच पथकांनी घरपोच जाऊन मतदान घेतल्याने चालता न येणाऱ्या व्यक्तींना मोठ्ठा दिलासा मिळाला.


 चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली त्यानुसार  सकाळपासून ८० टक्के दिव्यांग व्यक्ती व ८५+वयोवृद्ध व्यक्तींच्या घरी जाऊन मतदान घेतले आहे. दुपारी ४:००वाजे पावेतो  मतदान प्रक्रिया सुरू होती.चोपडाशहर,गलंगी,लासुर, चहार्डी, हातेडखुर्द,हातेड बुद्रुक,वर्डी,वडती,गणपुर, यावल तालुक्यातील चिंचोली,मनवेल,चुंचाळेसह मतदारसंघातील २५ गावातील ७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आप आपल्या पसंतीच्या उमेदवारांचे भाग्य  अजमिण्यासाठी मोलाचे योगदान ठरणार आहे. चोपडा शहरातील पत्रकार महेश पांडुरंग शिरसाठ या दिव्यांग  मतदारांच्या घरी जाऊन पाच नंबर पथकाने  मतदान घेऊन चोख कामगिरी बजावल्यामुळे दिव्यांग बांधवांना  मतदानापासून मुकावे  न लागल्याबद्दल व त्रास टळल्याबद्दल प्रशासनाचे त्यांनी आभार  व्यक्त केले आहेत.

 यासाठी सेक्टर अधिकारी संजय गोपाळ मिसर,मतदान अधिकारी उत्तम रतिलाल चव्हाण,मतदान अधिकारी योगेश जगन्नाथ सनेर,गायकोऑब्जर्वर रजत बांगडकर, पोलिस कर्मचारी निलेश पाटील, रविंद्र महाजन यांनी परिश्रम घेतले.

No comments