adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा मतदान बुथ वरील जखमी होमगार्डला सावदा पोलिसांचा मदतीचा हात

  मोठा वाघोदा मतदान बुथ वरील जखमी होमगार्डला सावदा पोलिसांचा मदतीचा हात   खाकी वर्दीतील हमदर्दीं पोलीसांचा उपचारास हातभार  रावेर प्रतिनिधी म...

 मोठा वाघोदा मतदान बुथ वरील जखमी होमगार्डला सावदा पोलिसांचा मदतीचा हात 

खाकी वर्दीतील हमदर्दीं पोलीसांचा उपचारास हातभार 


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

विधानसभा  निवडणूकसाठी  मोठा वाघोदा तालुका रावेर येथील मतदान केंद्रावर कर्तव्यावर असताना एका पोलीस गृहरक्षक कर्मचाऱ्याच्या  बोटास दरवाज्यात अगंठा अडकल्यामुळे व अंगठा नावापासून तुटून पडला व गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. संबंधित होमगार्ड ची खरची परिस्थिती हलाखीची व गरिबीची असल्याने  शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी सावदा पोलिसांनी वर्गणी जमा करीत मदतीचा हात दिला.

२० रोजी विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यात पोलिस खात्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी लावण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत  कर्मचाऱ्याच्या ड्युटी लावण्यात आल्या. त्यात मोठा वाघोदा येथे होमगार्ड कर्मचारी सुखदेव दयाराम धनगर (मुक्ताईनगर पथक) हे ड्युटीवर असताना त्यांच्या बोटावर दरवाजा आदळून अंगठ्याच्या भाग नखापासून वेगळा होऊन गंभीर दुखापत झाली.यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर मोठा वाघोदा येथे डॉ महेंद्र महाजन यांच्या दवाखान्यात प्रथमोपचार  करून पुढील शस्त्रक्रिया कामी जळगांव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेसाठी सावदा पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी, अंमलदार व पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ४३ हजार रुपये जमा करून सामाजिक बांधिलकी दाखवत जखमी होमगार्डला मदतीचा हात दिला या सामाजिक कार्यासाठी सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, पीएसआय अमोल गर्जे पीएसआय बशीर तडवी यांनी पुढाकार घेतला. याबद्दल सर्व पोलिस टीमचे परिसरातून कौतुक होत आहे.धनगर यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने उपचाराचा खर्च कसा करावा? असा प्रश्न त्यांच्या परिवारापुढे होता. ही मदत मिळाल्याने धनगर परिवाराने सावदा पोलिसांचे आभार मानले.

No comments