adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमच्या उमेदवाराचे मत फोडले म्हणून घुमावल येथे एकास मारहाण

 आमच्या उमेदवाराचे मत फोडले म्हणून घुमावल येथे एकास मारहाण चोपडा (प्रतिनिधी)--  (संपादक :- हेमकांत गायकवाड) चोपडा ग्रामिण पोलिस स्टेशन अंतर्...

 आमच्या उमेदवाराचे मत फोडले म्हणून घुमावल येथे एकास मारहाण


चोपडा (प्रतिनिधी)-- 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा ग्रामिण पोलिस स्टेशन अंतर्गत असणारे घुमावल येथील धनराज जगन्नाथ पाटील वय ६५ धदा शेती ह्या इसमाला गावातील  आरोपी --  १) वसंत प्रेमराज पाटील २) धनंजय वसंत पाटील ३) विशाल वसंत पाटील ४) देवानंद प्रेमराज पाटील ५) भुषण विश्वास पाटील यांनी पाच ही आरोपीतांनी   

फिर्यादी धनराज जगन्नाथ पाटील याला गावातील मारुती मंदिर चौकात दि.23 रोजी दुपारी 11 वाजता  मारहाण केली मारहाणीचे कारण असे की, तु माझ्या पक्षाचे गावात मतदान फोडले व आमच्या उमेदवारास पाडले व ग्रामपंचायतीचे सुध्दा तु आमचे विरुध्द बिनविरोध सरपंच निवडुन दिले व विकास सोसायटी मध्ये सुध्दा बिनविरोध बॉडी आमचे विरुध्द निवडुन दिले त्यादिवसापासुन तु आमच्या लक्षात आहे म्हणून आज तुला सर्वजण मिळून जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व मारहाण केले.म्हणून फिर्यादीने  दिलेल्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये पाच ही आरोपी विरोधात चोपडा ग्रामीण पो. स्टेशनला 

सी.सी.टी.एन.एस नं. २४२/२०२४ भा.न्या. सं कलम ११८(१).१८९(१), (२).१९१(२),१९०,११५(२),३५२,३५१(२) सह महा. पोलीस अधि. कलम ३७ (१), (३),१३५ प्रमाणे गुन्हा 

नोंद करण्यात आला.तसेच जखमी धनराज जगन्नाथ पाटील याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.चोपडा ग्रामीण पो.स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शना खाली पो.हे.का. नासीर तड़वी पो.नाईक  विश्वनाथ गायकवाड हे करीत आहे.

No comments