मोदीजी दिल्लीत बसून गुजरात मध्ये सरकार चालवितात तर महाराष्ट्रात रिमोट कंट्रोल ची सत्ता पाहिजे फैजपूर येथे राज्यसभा खासदार इमरान प्रत...
मोदीजी दिल्लीत बसून गुजरात मध्ये सरकार चालवितात तर महाराष्ट्रात रिमोट कंट्रोल ची सत्ता पाहिजे
फैजपूर येथे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी यांनी सभेत डागली तोफ
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार हे दबाव टाकून पैशाचे आमिष दाखवून खोटे आश्वासन करीत आहेत उद्धव ठाकरे साहेब यांची महाविकास आघाडी चांगल्या स्थितीत असताना पळवा पळवी चे करून महाराष्ट्रात सत्ता काबीज केली अशा भाजपा शिंदे गट शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी अशा सरकारला उखडून फेका असे रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे प्रवक्ते खासदार इमरान प्रतापगडी यांनी विशाल जनसमुदाय सभेत गर्जना केली ते पुढे म्हणाले की भाजपाचे लोक खोटे बोलण्यास पटाईक आहेस नागपुरात असलेली कंपनी गुजरात मध्ये नेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलण्यास हिम्मत करीत नाही मोदी सरकारने भारतातील विमान रेल्वे सेवा सरकारी फॅक्टरी विकत आहेत पूर्ण देशात विक्री करीत आहे खासदार इमरान प्रतापगडी पुढे म्हणाले की महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे या भूमीत वेगवेगळ्या समाजाचे घटकाचे लोक राहतात आणि भाजपाचे लोक जातीपातीचे एकमेकास लढण्याचे राजकारण करतात मात्र महाराष्ट्राची गरीब भोळी जनता बळी पडणार नाही
मोदी सरकारने महागाई वाढवून देश खाईत लोटला आहे दिल्लीत बसून गुजरात चालवितात डोळ्यासमोर निवडणूक असल्याने महाराष्ट्रात सुद्धा रिमोट कंट्रोल हातात ठेवण्यासाठी ते ताकद लावत आहेत राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी या युवा नेता यांना भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन करून मतदारांना आश्वासन दिले की धनंजय चौधरी त्यांच्यासोबत भुसावळचे उमेदवार राजेश मानवतकर चोपड्याचे उमेदवार प्रभाकर सोनवणे मुक्ताईनगर च्या उमेदवार रोहिणी ताई खडसे यांना विजयी करा असे मतदारांना आवाहन केले
आपल्यासोबत महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आहेत रावेर मधून धनंजय चौधरी यांना विक्रमी मतांनी निवडून द्या या भूमीत महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी गण १९३६ मध्ये आलेले होते त्या भूमीत मी पुन्हा येईल असे आश्वासन दिले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी आमदार शिरीष चौधरी माजी महापौर करीम सालार दीपक लांबा हरियाणा काँग्रेसच्या प्रतिभाताई शिंदे प्रभाकर आप्पा सोनवणे चोपड्याचे राजू तडवी माजी उपनगराध्यक्ष शे. कुरबान माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे सह महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब गट उद्धव ठाकरे साहेब गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित होता.



No comments