adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विधानसभा निवडणुकीमुळे विद्यार्थींना मिळणार सलग चार दिवस सुट्टी

विधानसभा निवडणुकीमुळे  विद्यार्थींना मिळणार सलग चार दिवस सुट्टी काल्पनिक फाईल चित्र  पुणे वृत्तसेवा  (संपादक :-हेमकांत गायकवाड) राज्यभरात सध...

विधानसभा निवडणुकीमुळे  विद्यार्थींना मिळणार सलग चार दिवस सुट्टी

काल्पनिक फाईल चित्र 

पुणे वृत्तसेवा 

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

राज्यभरात सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वातावरण असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे येत्या २० नोव्हेंबरला मतदान असल्याने प्रशासन कामाला लागलं आहे. तरी विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग निवडणूकीसाठी ड्युटीवर आहेत. त्यामुळे अनेक शाळांना १८, १९ आणि २० नोव्हेंबरला शाळा भरविणे अशक्य असल्याने  त्यामुळे राज्य सरकारने याबाबत शाळांना विनंती पत्र पाठवलं आहे. ज्या शाळांना शाळा भरवणे शक्य होणार नाही त्या शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सचिवांकडून सर्व शाळांना  याबाबतचे  विनंती पत्र पाठवण्यात आलं आहे. पण शाळेला सुट्टी देण्याबाबतचा निर्णय त्या त्या शाळेला घ्यायचा आहे. अर्थात ज्या शाळांकडून सुट्टी जाहीर केली जाणार त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना १८,१९ आणि २० नोव्हेंबरची सुट्टी तर मिळणारच यासोबत १७ नोव्हेंबरला रविवार असल्याने सलग चार सुट्ट्यांचा आनंद शालेय विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे शक्य होणार नाही. शिवाय मतदान केंद्र सुद्धा अनेक शाळेतच आहेत. या सगळ्याचा विचार करून या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा सुरु ठेवणं शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. "१८, १९,२० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना द्या", असं विनंती पत्र मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना द्या", असं विनंती पत्र राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी सर्व शाळांना पाठवलं आहे. शिक्षण आयुक्तांनी विनंती पत्रात काय नमुद केलेय "उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती", असं शिक्षण आयुक्तांनी पत्रात म्हटलं आहे.

No comments