लहान माळीवाडा नवेगाव परिसरात बाळासाहेबांना अभिवादन !... विकास पाटील / जळगाव (संपादक :- हेमकांत गायकवाड) धरणगांव :- हिंदूहृदय सम्राट बाळा...
लहान माळीवाडा नवेगाव परिसरात बाळासाहेबांना अभिवादन !...
विकास पाटील / जळगाव
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
धरणगांव :- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीदिनानिमित्त नगरपालिकेच्या माध्यमातून नवेगाव परिसरात बांधलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकास नवेगाव मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कुणबी पाटील समाजाचे सचिव महेश पाटील व तेली समाजाचे पंचमंडळातील सदस्य जितेंद्र चौधरी यांनी बाळासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार टाकून अभिवादन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चा चे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, तेली समाजाचे सदस्य गोपाल चौधरी, गोपाल महाजन, तेली समाजाचे पंच नाना चौधरी, परशुराम महाजन, कैलास चौधरी, सुखदेव चौधरी, किरण चौधरी, नितीन चौधरी,भरत चौधरी, अशोक महाजन, रवींद्र निकम, भैया चौधरी, राजेंद्र चौधरी, नारायण चौधरी, मधुकर पाटील, भारत पाटील व सर्व बाळासाहेब प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments