adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची 'आर .सी .बाफण गोशाळा व अनुसंधान केंद्र ' तसेच दीपस्तंभ फाउंडेशन ' मनोबल ' येथे क्षेत्रभेट

  सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची 'आर .सी .बाफण गोशाळा व  अनुसंधान केंद्र ' तसेच दीपस्तंभ फाउंडेशन ' मनोबल ' येथे क्षेत्...

 सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची 'आर .सी .बाफण गोशाळा व  अनुसंधान केंद्र ' तसेच दीपस्तंभ फाउंडेशन ' मनोबल ' येथे क्षेत्रभेट


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

सदगुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय ,जळगाव यांची दीपस्तंभ फाउंडेशन 'मनोबल 'राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संस्था व रतनलाल सी . बाफणा गोशाळा व अनुसंधान केंद्र , कुसुंबा जळगाव येथे दिनांक 16 नोव्हेंबर 2024 वार शनिवार रोजी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आलेली होती . त्याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे , क्षेत्रभेट समन्वयक डॉ .जयश्री पाटील , सहा.प्रा.सुवर्णा अहिरे ,निधी शर्मा , पंकज वाघ ,चंद्रकांत सपकाळे तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षक उपस्थित होते. सुरुवातीला आर .सी . बाफणा गोशाळा व अनुसंधान केंद्राला भेट देण्यात आली . येथील शाकाहार म्युझियम ,  ध्यान केंद्र ,कबूतरखाना , खत प्रकल्प तसेच दूध संकलन व प्रक्रिया केंद्र , सप्त गोमाता प्रदक्षिणा तसेच या ठिकाणी असलेल्या गाई व गाईंच्या जाती या विषयी माहिती मिळवण्यात आली . यानंतर जवळच असलेल्या दीपस्तंभ फाउंडेशन यांची दिव्यांग , अनाथ ,आर्थिक दुर्बल घटक आणि तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी कार्य करणारी देशातील अग्रगण्य संस्था मनोबल ला भेट देण्यात आली . तेथील समन्वयक सम्राट सर व योगेंद्र सर यांनी आम्हाला संपूर्ण संस्थेविषयी माहिती सांगितली .तिचा सुरुवातीपासूनचा प्रवास एका व्हिडिओ मार्फत दाखवून विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रतिमा कोरून या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची व संस्थेबद्दल सविस्तर वर्णन केले. या संस्थेची स्थापना यजुर्वेंद्र महाजन सरांनी केली जे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब होते . त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याची प्रेरणा व जिद्द सरांनी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दिली . त्यासाठी स्पर्धा परीक्षा ,उच्च शिक्षण तसेच व्यवसाय विकासासाठी प्रशिक्षण या संस्थेद्वारे गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते .ही भारतातील पहिली निवासी संस्था आहे जी सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी सज्ज झालेली आहे . या ठिकाणी तंत्र विज्ञानाचा वापर करून दृष्टीहीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते .त्यासाठी आवश्यक सर्व साधने इथे उपलब्ध करून दिलेली आहेत .तसेच कौशल्य विकास अंतर्गत चित्रकला ,संगीत ,विविध उपयोगी वस्तू बनविणे , शिवणकाम यांचे प्रशिक्षण सुद्धा इथे दिले जाते .आज जवळजवळ 200 विद्यार्थी या ठिकाणी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण घेत आहेत . त्यामध्ये पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा त्यानंतर मुलाखतीची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते .त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली जाते . तसेच थ्रीडी मॉडेल ,ब्रेल यासारख्या बाबींचा वापर करून शिक्षण क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी सहाय्यक ठरणारी ही साधनं इथं उपलब्ध करून दिलेली आहेत . या संस्थेमधील बैठक व्यवस्था तसेच वस्तीगृह , भोजनालय यांना सुंदर अशी नावे देण्यात आलेली आहेत .तसेच या ठिकाणी दीपावली यासारखे सण सुद्धा मोठ्या उत्साहाने या मुलांसोबत साजरे केले जातात .त्याचप्रमाणे सुविधा जनक पुस्तके , मोबाईल , संगणक , टॅब ,कीबो ,बोलणारे घड्याळ , डिजिटल बोर्ड तसेच खेळाचे साहित्य यामध्ये लुडो ,बुद्धिबळ यासारख्या उपयुक्त असणाऱ्या साहित्य विद्यार्थ्यांना पुरवले जाते . त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे उपयुक्त आहेत याची जाणीव होते.त्याचप्रमाणे तज्ञ मार्गदर्शक , समुपदेशक यांचेही पुरेपूर मार्गदर्शन येथे लाभते . तसेच आवारामध्ये जिमखाना ,खेळाचे मैदान , ध्यान केंद्र यासारख्या वास्तू उभारलेल्या आहेत .जेणेकरून विद्यार्थ्यांचा  विकास साधला जाईल . त्याचप्रमाणे जे विद्यार्थी अनाथ आहेत त्यांचे लग्न करून देऊन या मुली इथं माहेरपणाला सुद्धा येतात म्हणजे एक सामाजिक बांधिलकी या संस्थेमार्फत त्या ठिकाणी जपली जाते. अशी ही अतुलनीय कार्य करणारी संस्था आहे . या क्षेत्रभेट आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार तसेच क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ . अनिता वानखेडे ,डॉ .प्रतिभा पाटील ,डॉ . अनिता जावे , डॉ . जयश्री पाटील ,स . प्राध्या . सुवर्णा अहिरे , निधी शर्मा ,जयश्री शिंगाडे , पंकज वाघ ,अरविंद पवार , चंद्रकांत सपकाळे व प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षकांचे सहकार्य लाभले

No comments