चोपडा विधानसभा मतदारसंघातून महायुती, शिंदे सेनेचे, उमेदवार मा.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा दणदणीत विजय . चोपडा प्रतिनिधी / खलील तडवी बिडगाव ...
चोपडा विधानसभा मतदारसंघातून महायुती, शिंदे सेनेचे, उमेदवार मा.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा दणदणीत विजय.
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
विधानसभा मतदारसंघाचा धुराळा अखेर उमेदवार माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या गळ्यातच मतदारांनी विजयाची माळ टाकून शांत केला. शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत बळीराम सोनवणे यांना 01 लाख 22 हजार 826 मते तर प्रतिस्पर्धी व पराभूत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांना 90513 मते मिळाली यात प्रभाकर गोटू सोनवणे यांचा 32313 मतांनी पराभव झाला.
तर बसपाचे युवराज बारेला यांना 1295 मते,भारत आदिवासी पार्टी चे सुनील तुकाराम भील यांना 1601 मते,तर पुढील सर्व अपक्ष अमित सिराज तडवी यांना 598 मते, अमिनाबी तडवी यांना 324 मते, बाळू साहेबराव कोळी यांना 331 मते, संभाजी सोनवणे यांना 562 मते, हिरालाल कोळी यांना 2118 मते आणि नोटाला सर्वात जास्त म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली 2420 एवढी मध्ये नोटाला मिळालेले आहेत.
शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यासाठी आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सर्व धुरा हातात घेतलेली होती तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांच्याकडे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी,माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील हे सर्व प्रमुख नेते असूनही केवळ एकट्याच्या दमावर चंद्रकांत सोनवणे यांनी हा मोठा विजय खेचून आणला.
पंधराव्या फेरीनंतर 13 हजार मतांचे लीड असल्यानंतर प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी काढता पाय घेतला. तर शहरासह ग्रामीण भागात चंद्रकांत सोनवणे यांना मोठे लीड मिळालेले असल्याचे समजल्यानंतर चंद्रकांत सोनवणे यांचे चाहते व नागरिकांनी महाविद्यालयाकडे धाव घेतली आणि प्रचंड जल्लोष साजरा केला.





No comments