विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतमोजणी दिनांक २३/११/२०२४ रोजी पासुन तर २५/११/२०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय-योजना लागू जळगाव प्रतिनिध...
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
मतमोजणी दिनांक २३/११/२०२४ रोजी पासुन तर २५/११/२०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय-योजना लागू
जळगाव प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम दिनांक १५/१०/२०२४ रोजी घोषीत केला आहे. यामुळे दि.२५/११/२०२४ पर्यंत जिल्हयातील मतमोजणी केंद्रांचे ठिकाणी मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि आप-आपसात वादविवाद करण्यास, मोठ्या प्रमाणात घोषणा करणेस प्रतिबंध लावण्यात आले आहेत तर जळगाव जिल्हाधिकारी यांना सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणने ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ नुसार एकतर्फा आदेश काढण्यात आले आहेत. मा.जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
मी, आयुष प्रसाद, जिल्हादंडाधिकारी जळगाव, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश देत आहे की, निवडणूकी चे कालावधीत जिल्हयात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जळगाव जिल्हयातील मतमोजणी केंद्रांचे ठिकाणी मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि आप-आपसात वादविवाद करण्यास, मोठ्या प्रमाणात घोषणा करणेस प्रतिबंध करण्यात येत आहे. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक २५/११/२०२४ पर्यंत) अंमलात राहतील. सदरचा आदेशाचा भंग भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल. सदरचा आदेश आज दिनांक २२/११/२०२४ रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला असे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे


No comments