लाडक्या बहिणींचीं चंद्रकांत पाटील भाऊंना साथ सलग दुसऱ्यांदा आमदारकिची माळ गळ्यात मुक्ताईनगर मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांचा दरारा...
लाडक्या बहिणींचीं चंद्रकांत पाटील भाऊंना साथ सलग दुसऱ्यांदा आमदारकिची माळ गळ्यात
मुक्ताईनगर मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांचा दरारा कायम
संपादक हेमकांत गायकवाड
मुक्ताईनगर मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून मुक्ताईनगर मतदार संघात झालेल्या लक्षवेधी लढतीत महायुतीचे चंद्रकांत निंबा पाटील हे पुन्हा दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीच्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या गडाला दुसऱ्यांदा सुरूंग लावण्यात आमदार चंद्रकांत पाटील यशस्वी झाले असल्याचे चित्र दिसत आहे
मुक्ताईनगर मतदार संघात एकूण २१५०११ मतदान झाले. त्या पैकी महायुतीचे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांना १,११,६०१ मते मते मिळाली. यात महायुतीचे चंद्रकांत पाटील हे २३,९४५ मतांनी विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या रोहिणी एकनाथराव खडसे यांना ८७,६५६ यांना मते मिळाली यात महायुतीचे चंद्रकांत पाटील हे २३,९४५ मतांनी विजयी झाले. वंचित आघाडीचे संजय ब्राम्हणे यांना ५४३५ मते मिळाली तर अपक्ष विनोद सोनवणे यांना २३१६ मते मिळाली. गतवर्षीच्या २०१९ च्या विधानसभेत अवघ्या एक हजार ९५७ मतांनी आमदार पाटील यांचा विजयश्री खेचून आणला होता मात्र यावेळी पाटील यांनी अधिक लीड घेत खडसेंच्या बालेकिल्ल्यातील बुरुजालाही धक्का दिला. मुक्ताईनगरात अपक्षांची ही गर्दी वाढली होती तर आमदार चंद्रकांत पाटील व ॲड. रोहिणी खडसे यांच्या नावा सारखेच साधर्म्य असलेल्या उमेदवारांनाही उभे करण्यात आले होते तर बहूजन वंचित आघाडीनेही आपला उमेदवार दिला होता मात्र येथील विधानसभेच्या मतदारांनी सर्वांनाच पराभवाचा आश्चर्यकारक धक्का दिला
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शनिवारी, २३ रोजी झालेल्या मतमोजणीत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे यांचा २३ हजार ९०४ मतांनी पराभव केला आहे. मुख्यमंत्री हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी मुक्ताईनगरात येऊन गेले. त्यानंतर अभिनेता गोविंदा यांचा रोड शो देखील गाजला तर ॲड. रोहिणी खडसे यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली तर खासदार अमोल कोल्हे यांनी रोड शो केला. महायुतीकडून निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना लागू करण्यात आली व तिचा मोठ्या प्रमाणावर प्रचार, प्रसार झाल्याने लाडक्या भावासाठी अर्थात आमदार पाटील यांच्यासाठी बहिणी धावून आल्या शिवाय मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच हजार कोटींची कामे केल्याचे सभेत सांगून आमदारांना बळ दिल्याने त्याचाही प्रभाव निवडणुकीत दिसून आला.
पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या २३व्या फेरीपर्यंत ॲड. रोहिणी खडसे पिछाडीवर होत्या. आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी कौल दिला आहे. सावदा, मुक्ताईनगर, बोदवड येथील बहुतांश बूथवर चंद्रकांत पाटील यांनी आघाडी घेतलेली असल्याचे दिसून येत आहे. सर्वच समाजातील घटकांनी चंद्रकांत पाटील यांना भरभरून मतदान केले आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'चा फायदा झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे
हा जनतेचा व कार्यकर्त्यांचा विजय : आमदार चंद्रकांत पाटील माझा हा एकट्याचा विजय नसून मतदारसंघातील जनतेचा व यशासाठी मेहनत घेतलेल्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, अशी भावना आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

No comments