घरकूलांचे त्वरित वाटप न झाल्यास पूढील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषण वाशीम प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) तामसा...
घरकूलांचे त्वरित वाटप न झाल्यास पूढील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आमरण उपोषण
वाशीम प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
तामसाळा ता. जि वाशिम येथिल घरकूल वाटपात आफरा तफर झाली असल्याचे बोलले जात असुन या गावातील घरकूल यादीत आलेल्या लाभार्थ्यांना घरकूल वाटपाचा लाभ झालेला नाही. अश्या आशयाचे निवेदन दिपक शंकर हजबे बहूजन भारत पार्टी जिल्हाध्यक्ष ऑटो संघटना वाशिम, तामसाळा ता. जि वाशिम यांनी मा. जिल्हामुख्याधिकारी साहेब, जि.प वाशीम. ता जिल्हा वाशीम यांना सादर केले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी नामे दीपक शंकर हजबे. असुन वरील ठिकाणी गेल्या ६० वर्षापासून राहतो. माझ्या सारखेबरेच जण तामसाळा गावात राहतात माझ्या वडिलाचे नाव प्रधान मंत्री आवास योजना मध्ये यादीत असूनही मला अद्यापही घरकुल वाटप झाले नाही, माझ्या वडिलांचे सारखे माझ्या गावात जवळपास ३० कुटुंबे आहेत ज्यांचे यादीत नाव असूनही अद्यापही घरकुल वाटप झाले नाही माझ्या वडिलांचे घरकुल आले का? असे विचारायला गेलो असता येथिल ग्रामसेवक श्री. लांडगे साहेब हे सांगतात कि पुढच्या महिन्यात येईल. पण अद्यापही घरकुल वाटपची रक्कम मिळाली नाही तरी येथील ग्रामसेवक श्री लांडगे साहेब हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहेत असे आम्हाला लक्षात येते यांचेवर कायदेशिर कारवाई व्हावी मातीचे घरे असूनही घरकूल न देता पक्की घरे असणाऱ्यांनाच घरकूलांची रक्कम वाटप करण्यात आली आहे त्यामूळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी दिपक शंकर हजबे यांनी २५/११/२०२४ रोजी श्री. जिल्हा मुख्याधिकारी साहेब यांना याबाबतीचे निवेदन दिले होते. व त्याच बरोबर ३० कुटूंबांना घरकूल रक्कम अदा करण्यात यावी अशी मागणी दिपक हजबेंसह करण्यात आली तरी ३० कुटूंबांचे घरकूलांचे त्वरित वाटप न झाल्यास पूढील महिन्यात आमरण उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी अशी माहिती दिपक शंकर हजबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
No comments