एक गावठी बनावटीचा कट्टा, व एक जिवंत काडतूससह दोघांना अटक चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई काल्पनिक फाईल चित्र चोपडा प्रतिनिधी (संपादक ह...
एक गावठी बनावटीचा कट्टा, व एक जिवंत काडतूससह दोघांना अटक
चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई 
काल्पनिक फाईल चित्र
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दि.१५/११/२०२४ रोजी रात्री २२.०० वाजेचे सुमारास लासुर ते सत्रासेन रस्त्यावरील देवी कमळजा माता मंदीराच्यासमोर टेकडी जवळ लासुर ता.चोपडा जि.जळगाव येथे शिवतेज शिवाजी जावळे वय ३० वर्ष रा.चांदापूर्व,ता.नेवासा,जि,अहिल्यानगर २) अक्षय रामदास चेमटे वय २४ वर्ष,रा.श्रीराम नगर,ता.नेवासा, जि.अहिल्यानगर यांनी स्वतः चे आर्थीक फायद्यासाठी एक गावठी बनावटीचा कट्टा,व एक जिवंत काडतूस विनापरवाना स्वताचे कब्जात बाळगताना मिळून आले तर त्यांच्या जवळ १)३०,०००/-रु किंमतीचा एक गावठी बनावटीचा स्टील धातुचा कट्टा मॅग्झीनसह व त्यास काळ्या रंगाची मुठ व आरोपी क्र ०१ याचे पेंटच्या खिश्यातून ३०० रु रोख २) १,०००/- रु किमतीचा एक पिवळ्या धातुचा जिवंत काडतुस व आरोपी क २ च्या खिश्यातून २०० रु रोख एकूण ३१,५००/- या प्रमाणे मिळून आले तर पोकॉ निलेश हिम्मत पाटील चोपडा ग्रामीण पोस्टे यांचे फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भा.ह.का. कलम ३/२५.मु.पो. अधि.कलम ३७(२)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.सदरची कारवाई पोना शशिकांत पारधी,रावसाहेब पाटील,चेतन महाजन,निलेश पाटील यांनी केली.पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोनि कावेरी कमलाकर यांचे मार्गदर्शनाखाली पोना शशिकांत पारधी हे करीत आहेत
No comments