अनिलभाऊ चौधरी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जात-पात धर्म समाज पाहत नाही :- बच्चू कडू फैजपूर येथे जाहीर सभेत आ. बच्चू कडू गरजले इदू पिंजारी ...
अनिलभाऊ चौधरी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे जात-पात धर्म समाज पाहत नाही :- बच्चू कडू
फैजपूर येथे जाहीर सभेत आ. बच्चू कडू गरजले
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ. बच्चू कडू यांची रावेर येथे भव्य सभा आयोजित केली होती. त्यासभेत त्यांनी महायुती आणि महाआघाडीचा खरपूस समाचार घेतला. अनिलभाऊ चौधरी एक निष्ठावंत कार्यकर्ता असून आमदार नसून सुद्धा त्यांनी रावेर यावल तालुक्यासाठी ४० कोटी रुपये निधी आणला तर आमदार झाले तर कोट्याधीश रुपयाचे कामे करण्यासाठी आणून त्यांच्यात धमक आहे असे फैजपूर येथे भव्य आयोजित जाहीर सभेत आमदार बच्चू कडू यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की असा माणूस आहे की जात-पात धर्म न पाहणारा मनुष्य नाही आमदार शिरीष चौधरी यांचे वर टीका करताना ते म्हणाले की हा माणूस झोपेच्या गोळ्या घेतो त्याला शोधा पाच वर्षे कुठे होता शैक्षणिक संस्था काढल्या गरीब लोकांच्या मुलाला कधी नोकरीवर लावले का आता मुलासाठी मते मागत आहे कोण मते देणार ते आपल्या प्रखर शैलीत पुढे म्हणाले की भाजप महायुतीचे सरकार आणि महाविकास आघाडी हे दोघे पक्ष सारखे असून प्रहार पक्षाचे महाराष्ट्रात पंधरा उमेदवार दिलेले आहेत ते पूर्ण उमेदवार निवडून येतील दिनांक २० नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक चार, बॅट समोरील बटन दाबून अनिल भाऊ चौधरी यांना प्रचंड मतांनी विजयी करा. यावेळी माजी आमदार संतोष भाऊ चौधरी उमेदवार अनिल भाऊ चौधरी जावेद खान हर्षा चौधरी राजेश खत्री यांचीही भाषणे झाली यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. तर
अनिल चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि मि मतदार संघात एक-एक कार्यकर्ता जोडला. सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडे गाडीत पेट्रोल भरायला देखील पैसे नसतात, असे बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी भावूक झाले. माझ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आमिष दाखवले जातात मात्र तो विकला जाणार नाही. माझ्यासमोर बसलेला जनसमुदाय माझा धर्म आणि समाज आहे. तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते. धर्म, जातीचे राजकारण घराणेशाहीने सुरू केले आहे. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हेच दाखल होणार नाही इतकी शांतता होईल. रावेरमध्ये नेते भाजप, काँग्रेस मिळून जातीवाद करतात. रावेरचा कोणताही विकास झालेला नाही. आज इथे जमलेली जनता पैसे देऊन आणलेली नाही. काही लोक माझी बदनामी करतात. भविष्यात आणखी अफवा पसरवतील मात्र त्यावर विश्वास न ठेवता दि. २० रोजी अनुक्रमांक ४ बॅट चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन अनिल छबिलदास चौधरी यांनी केले. प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments