adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एक वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम भिंगारात ताब्यात गुन्हा दाखल भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

  एक वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम भिंगारात ताब्यात गुन्हा दाखल भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई  अहिल्यानगर प्रतिनिधी:- (संपादक. :-हेमकांत गाय...

 एक वर्षाकरिता हद्दपार केलेला इसम भिंगारात ताब्यात गुन्हा दाखल भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई 


अहिल्यानगर प्रतिनिधी:-

(संपादक. :-हेमकांत गायकवाड)

उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहिल्यानगर यांनी एक वर्षाकरीता अहिल्यानगर जिल्हयातुन हददपार केलेला गुन्हेगार भिंगार शहरात आल्याने त्याचेवर भिंगार कॅंम्प पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.सार्वत्रीक विधानसभा निवडणुक व मतमोजणी प्रक्रिये दरम्यान सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंघाने कँम्प पोलीस स्टेशन हददीतील आन्या ऊर्फ आनंद राजेंद्र नायक रा.नेहरु चौक माळ गल्ली भिंगार ता. जि.अहिल्यानगर) यांना हददपार केले होते.तसा या बाबतचा आदेश श्री. सुधिर पाटील  उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहिल्यानगर यांनी दिला होता.परंतु सदर इसम हा अंतीम चौक पाटील गल्ली भिंगार शहर येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी तपास पथकातील अंमलदार यांना भिंगार शहरात पेट्रोलींग करीत असताना मिळाल्याने सदरची माहिती सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना सांगितल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करणे बाबत तपास अंमलदारांना आदेश दिल्याने बातमीतील नमुद ठिकाणी जावून सापळा लावला असता त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे,चंद्रकांत माळोदे,पोहेकॉ.दिपक शिंदे,संदीप घोडके,रवी टकले,पोकॉ.प्रमोद लहारे,समीर शेख, अमोल आव्हाड यांनी केली आहे.

No comments