प्रचार तोफा थंडावल्या .. मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज ३८ सेक्टर अधिकारी व १४ मायक्रो ऑब्झर्वर ठेवणार ५२ केंद्रांवर कडी नजर चोपडा प्रति...
प्रचार तोफा थंडावल्या .. मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज
३८ सेक्टर अधिकारी व १४ मायक्रो ऑब्झर्वर ठेवणार ५२ केंद्रांवर कडी नजर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (अ.ज) विधानसभा मतदारसंघासाठी दि.२० रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून दि.१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर उमेदवारांचे कार्यालय, त्यांची वाहने, वाहनांवर लावलेली पोस्टर्स शहरात किंवा ग्रामीण भागात लावलेली पोस्टर्स काढणे आवश्यक आहे. हे सर्व पोस्टर्स काढून जमा करावीत. जाहीर प्रचार पूर्णपणे बंद झाला असल्याने पूर्ण ३८७ मतदान केंद्रांवर शांततेत मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी केलेले आहे.दिनांक १८ रोजी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून दिलेली आहे.
चोपडा विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.एकूण ३८७ मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर म्हणजे १९८ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार असून निवडणूक आयोग थेट १९८ मतदान केंद्रांवर मतदान कसे सुरु आहे यावर लक्ष ठेवणार आहे. विधानसभेसाठी ३८ सेक्टर अधिकाऱ्यांकडून व १४ मायक्रो ऑब्झर्वर कडूनही ५२ मतदान केंद्रांवर चिकित्सक लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच चोपडा तालुक्यात तीन तर यावल तालुक्यात सहा असे एकूण नऊ मतदान केंद्रांवर मोबाईलची रेंज नसते त्या ठिकाणी शॅडो मतदान केंद्रे म्हणून मायक्रो ऑब्झर्वर लक्ष ठेवणार आहेत. यापूर्वी दोन प्रशिक्षणे अतिशय उत्साहात मतदान कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत.मतदानासाठी मतदान यंत्रांचे तीन वेळा रँडमायजेशन केलेले आहे.या सर्व मतदान यंत्रांवर मतपत्रिका लावणे,त्यात १००० मतदान करणे हे सर्व उमेदवारांसमक्ष कार्य केलेले आहे.दि.२० रोजी सकाळी ०५.३० वाजता मतदान केंद्रांवर मॉक पोल होईल. तर सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रांसह सर्व साहित्य हे स्वीकारून मतदान यंत्र हे महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या क्रीडा संकुलामध्ये सील केले जाणार आहेत. या मतदान केंद्रांच्या स्ट्रॉंग रूम शेजारी स्थानिक पोलीस, राज्य पोलीस आणि सीआरपीएफ च्या जवानांची देखरेख असणार आहे. या मतदान यंत्रे ठेवलेला स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाही थांबण्याची मुभा आहे.किंवा प्रतिनिधी त्या ठिकाणी थांबू शकतात. यापूर्वी ७० दिव्यांग की, जे अंथरुणाला खिळून होते अश्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे मतदान झालेले आहे. उर्वरित दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली असून ज्या दिव्यांगांना घरापासून मतदान केंद्र पर्यंत आणायचे असेल अशांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था ही केलेली आहे. त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केलेली आहे. चोपडा तालुक्यातील १०३३ मतदान कर्मचारी हे बाहेर निवडणुकीच्या कर्तव्यासाठी जाणार असल्याने त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट ची व्यवस्था केलेली आहे. त्यापैकी ७५० कर्मचाऱ्यांचे मतदान झालेले असून उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी दिनांक १९ पर्यंत तहसील कार्यालयात मतदानासाठी व्यवस्था केलेली आहे. दिनांक २० रोजी होणाऱ्या मतदानासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख ३१ हजार ३८४ मतदारांमध्ये एक लाख ६७ हजार ८०१ पुरुष मतदार तर एक लाख ६३ हजार ५८० स्त्री मतदार आणि तीन मतदार हे ट्रांसजेंडर म्हणून असे एकूण तीन लाख ३१ हजार ३८४ मतदारांची संख्या असल्याचेही पाटोळे यांनी सांगितले. तसेच मतमोजणीसाठी २१ टेबल ची व्यवस्था केलेली असून त्यात १४ टेबलवर मतदान यंत्रातील मतमोजणी होणार असून पाच टेबलवर पोस्टल बॅलेट ची मोजणी होणार आहे. तर सैन्य दलातील ५०७ मतदारांसाठी दोन टेबलची अशी एकूण २१ टेबल ची व्यवस्था केलेली आहे.तर मतमोजणीच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम निकाल येईल. निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.


No comments