adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निवडणूक कामी गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल

  निवडणूक कामी गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या आदेशानुसार चोपडा प्रति...

 निवडणूक कामी गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्या आदेशानुसार


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे भाग 5 (CCTNS) गु.रं.नं.581/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 206,223 सह लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे  सचिन किसन बांबळे वय 33 वर्षे,नायब तहसिलदार (निवडणुक) तहसिल कार्यालय, चोपडा,जि.जळगांव रा.सराईपेठ जुन्नर ता.जुन्नर जिल्हा पुणे ह.मु शिवकॉलनी चोपडा ता.चोपडा जि.जळगाव यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पोलीस ठाण्यात मि हजर राहुन फिर्याद लिहून देतो की,मी तहसिल कार्यालय चोपडा येथे नायब तहसिलदार या पदावर कार्यरत असुन सध्या भारत निवडनुक आयोगाने दिनांक 15/10/2024 रोजी विधानसभा 2024 ची सार्वत्रीक निवणुक कार्यक्रम घोषीत केलेला आहे.सदर कार्यक्रमा नुसार मी 10- चोपडा (अ.ज.)विधानसभा मतदारसंघाचे निवणुक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांचे सोबत वरीष्ठांचे आदेशाने निवडणुकीचे कामकाज पाहत आहे.निवडणुक कामकाजाकरीता विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना नेमण्यात आले आहे.दिनांक 12/11/2024 रोजी 11/00 ते 18/00 वाजे पावेतो बॅटमिंटन हॉल,कला शास्त्र व वाणीज्य महाविदयालय चोपडा येथे EVM व VVPAT मशिन सेटींग व सिलींग कामा करीता शशिकांत शिवाजी पाटील,प्राध्यापक,पॉलिटेक्निक कॉलेज,चोपडा यांची विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 कामी 10- चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघाकरीता आदेश क्र./ निवडणुक/कावि/613/2024 दिनांक 08/11/2024 अन्वये नियुक्ती करण्यात आली होती.शशिकांत शिवाजी पाटील हे सदर कामकाजा करीता कोणतीही परवानगी न घेता सदर दिवशी कर्तव्यावर गैरहजर राहीले असुन त्यांनी,त्यांना नेमुन दिलेल्या निवडणूक कामात टाळाटाळ केली आहे.तसेच 10- चोपडा (अ.ज.)विधानसभा मतदारसंघाचे निवणुक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांचे आदेशाची अवज्ञा केली आहे.सदर बाबत शशिकांत शिवाजी पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी क्र./विधानसभा-2024/निवड/कावि/669/2024 दिनांक 12/11/2024 11/2024 अंन्वये कारणे दाखवा नोटीस काढुन सदर नोटीस बजावणी कामी निलाचंद जानकिराम देशमुख नगरपरिषद चोपडा शिपाई यांची नियुक्ती केली असता आदेशा प्रमाणे निलाचंद देशमुख हे शशिकांत शिवाजी पाटील यांना सदर कारणे दाखवा नोटसची बजावणी करणेस गेले असता त्यांनी सदरची नोटीस स्विकारली नाही.तसेच सदर कामकाजा करीता गैर हजर राहणे बाबत कोणत्याही प्रकारे खुलासा सादर केलेला नाही.करीता मला 10 चोपडा (अ.ज.)विधानसभा मतदारसंघाचे निवणुक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी क्र./निवड/विधानसभा/10-चोपडा/721/2024 दि.21/11/2024 अंन्वये शशिकांत शिवाजी पाटील प्राध्यापक,पॉलिटेक्निक कॉलेज,चोपडा यांचे विरुध्द पोलीस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल करणे कामी प्राधिकृत केले आहे.त्याप्रमाणे मी आज रोजी पोलीस स्टेशनला उपस्थित राहून फिर्याद देत आहे.तरी दिनांक 12/11/2024 रोजी 11/00 ते 18/00 वाजेच्या दरम्यान बॅटमिंटन हॉल,कला शास्त्र व वाणीज्य महाविदयालय चोपडा येथे EVM व VVPAT मशिन सेटींग व सिलींग कामा करीता शशिकांत शिवाजी पाटील,प्राध्यापक,पॉलिटेक्निक कॉलेज,चोपडा यांची नियुक्ती करण्यात आली असतांना ते सदर कामकाजा करीता कोणतीही परवानगी न घेता कर्तव्यावर गैर हजर राहुन त्यांना नेमुण दिलेल्या निवडणूक कर्तव्यास टाळाटाळ केली तसेच 10- चोपडा (अ.ज.)विधानसभा मतदारसंघाचे निवणुक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांचे आदेशाची अवज्ञा केली आहे. म्हणून माझी शशिकांत शिवाजी पाटील यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 206,223 सह लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे कायादेशीर फिर्याद आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक यांच्या आदेशान्वये पोउपनिरी.जितेंद्र वल्टे हे करीत आहे

No comments