स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात मुक्ताईनगर प्रतिनिधी :- सतीश गायकवाड ...
स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात
मुक्ताईनगर प्रतिनिधी :- सतीश गायकवाड
(संपादक :- हेमकांत गायकवाड )
मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल,मुक्ताईनगर येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात.
शाळेत दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर 2024, या कालावधीत घेण्यात येणाऱ्या खेळ महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली.
खेळ महोत्सवाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के वडस्कर, स्पर्धा प्रमुख राजश्री फेगडे मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन तथा मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या तसेच विविध खेळांच्या स्पर्धेकरिता पंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या सहशिक्षक शुक्लोधन बोदडे,तुषार पाटील, सतीश गायकवाड,जागृती राणे मॅडम, रोशन मालगे ,अमोल सुतार तर कॉमेन्टेटर म्हणून लाभलेल्या सहशिक्षक वैभव पाटील,स्वप्नील चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक खेळ महोत्सव हा सलग तीन दिवस चालणार आहे,यात शाळेतील 800 विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा घेण्यात येणाऱ्या विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग असणार आहे; शालेय जीवनात व विद्यार्थीदशेत खेळांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विविध शारीरिक खेळ खेळल्याने शरीर व मन स्वास्थ लाभते तथा सौम्य प्रकारचे आजार सुद्धा बरे होतात; खेळ हे जीवनाचे अविभाज्य भाग आहे म्हणून आपण खेळ खेळलोच पाहिजे इतर क्षेत्रांप्रमाणे आपण खेळ विश्वात सुद्धा यशस्वी अशी कामगिरी करून चांगले करिअर घडू शकतो तथा देशाचे नाव उज्वल करू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी खेळांकडे सुद्धा विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे अध्यक्षही मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर यांनी केले तर शाळेच्या सचिव माननीय श्रीमती रक्षाताई खडसे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले तथा या खेळ महोत्सवा प्रारंभी भ्रमणध्वनीद्वारे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना तथा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हा खेळ महोत्सव यशस्वीरीत्या पार पडावा म्हणून हार्दिक- हार्दिक शुभेच्छा दिल्यात त्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांन तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.


No comments