सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश ...
सदगुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
( संपादक :- हेमकांत गायकवाड)
सदगुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय ,जळगाव येथे आज दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे मॅम होत्या . तसेच डॉ . प्रतिभा पाटील , डॉ. जयश्री पाटील सहा.प्रा.सुवर्णा अहिरे ,निधी शर्मा , श्री पंकज वाघ ,श्री चंद्रकांत सपकाळे तसेच प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले तसेच डॉ० जयश्री पाटील यांनी 28 नोव्हेंबर हा दिवस का साजरा केला जातो त्याचे प्रास्ताविक सादर केले . कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर डॉ. प्रतिभा पाटील स . प्राध्यापक सुवर्णा अहिरे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटा बद्दल माहिती सांगितली . कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये डॉ . अनिता वानखेडे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी केलेल्या शैक्षणिक चळवळी बद्दल आढावा घेतला व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती दिली . त्यांचे कार्य समाजासाठी कसे पूरक आणि थोर होते . त्यांच्या समवेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सहकार्य ही कसे अनमोल ठरले . हे त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केले .शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या पुस्तकांबद्दल माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स० प्राध्यापक निधी शर्मा यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ . अनिता वानखेडे ,डॉ .प्रतिभा पाटील ,डॉ . अनिता जावे , डॉ . जयश्री पाटील ,स . प्राध्या . सुवर्णा अहिरे , निधी शर्मा ,जयश्री शिंगाडे , पंकज वाघ , अरविंद पवार , चंद्रकांत सपकाळे व प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षकांचे सहकार्य लाभले.
No comments