कठोरा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक :-हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील कठ...
कठोरा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील कठोरा ग्रामपंचायत कठोरा येथे भारतीय संविधानाचे जनक राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन सरपंच एकनाथ दामू कोळी यांचे हस्ते करण्यात आले व संविधानाचे वाचन करून जनजागृती आणि प्रतिज्ञा करण्यात आली.तसेच श्रीफळ व खडीसाखर वाटप करून गोडवा करण्यात आला.यावेळी सरपंच एकनाथ दामू कोळी,मनीषा वासुदेव महाजन ग्रामसेवक,रमाबाई व्यंकट पानपाटील,अनिल पान पाटील,भगवान सिताराम पाचवणे ग्रामपंचायत शिपाई उपस्थित होते.
No comments