Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर आठवडे बाजारातील सुलभ शौचालय सह विविध समस्था बाबी आ अमोलजी जावळे ची नगरपालिकास भेट

  फैजपूर आठवडे बाजारातील सुलभ शौचालय सह विविध समस्या बाबतीत आ .अमोलजी जावळे ची नगरपालिकेस भेट  रामराज्य च्या तक्रारीने वेधले आमदाराचे लक्ष  ...

 फैजपूर आठवडे बाजारातील सुलभ शौचालय सह विविध समस्या बाबतीत आ .अमोलजी जावळे ची नगरपालिकेस भेट 

रामराज्य च्या तक्रारीने वेधले आमदाराचे लक्ष


 

इदु पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रामराज्य सेवाभावी संस्था तर्फे आठवडे बाजारातील तीन - चार वर्षा पासून सुरु होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सुलभ शौचालय  प्रश्न तसेच शहरातील बंदपथदिवे , गटारी स्वच्छता, आदी मूलभूत समस्यांच्या  बाबतीत नवनिर्वाचित आमदार अमोलजी जावळे यांनी भेट दिली व नपा प्रशासनातील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून या सर्व नागरि मूलभूत समस्यांचे तात्काळ मार्गी लावण्यासाठी व नपा मध्ये येणाऱ्या सर्व तक्रारीचे नोंद वही मध्ये मेंन्टन्स करा तसा खुलासा देण्याचे सूचना दिल्या आहेत यावेळी त्यांच्या सोबत न.पा. प्रशासक तथा फैजपूर प्रांतधिकारी बबनरावं काकडे उपस्थित होते 

     यावेळी न.पा.तील अधिकारी कर्मचारी यांचे शी संवाद साधून समस्या अडीअडचणी जाणून घेत आठवडे बाजारातील सुलभ शौचालय,स्वामी समर्थ केंद्र, जेष्ठ नागरिक संघ समोरील व श्रीकृष्ण नगर मधील गटारीतील रस्त्यावर आलेले सांडपाणी समस्था,बंद पथ दिवे , आरोग्य फवारणी, शहरातील नियमित स्वच्छता, समस्या तात्काळ मार्गी लावून सर्व नागरी समस्यांची तक्रार प्रत्येक विभागाची स्वतंत्र नोंद वही मेन्टन्स करण्याच्या सूचना केल्या आहे 

  यावेळी भाजपा चे जिल्हा कार्यालयीन मंत्री गणेश माळी, माजी उपगराध्यक्ष हेमराज चौधरी,माजी नगरसेवक केतन किरगे, संजय महाजन, रावेर माजी नगरसेवक सूरज चौधरी,नितीन राणे योगेश रामराज्य सेवा संघ चे संजय सराफ, निलेश चौधरी, निलेश कोल्हे,  यासह आदी मान्यवर व नपाचे ओएस संगीता बाक्षे, सॉनिटरी अधिकारी लक्ष्मण चिरावन्डे, इंजिनिअर ऋतुजा पाटील, प्रविण सपकाळे आदी अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते

No comments