Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खुनाच्या गुन्हयातील आरोपी अवघ्या १२ तासाच्या आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

  खुनाच्या गुन्हयातील आरोपी अवघ्या १२ तासाच्या आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई अहिल्यानगर (दि.६ प्रतिनिधी):-...

 खुनाच्या गुन्हयातील आरोपी अवघ्या १२ तासाच्या आत जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई


अहिल्यानगर (दि.६ प्रतिनिधी):-

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर मध्ये मध्यरात्री झालेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात

स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी श्री.ज्ञानेश्वर बाळसाहेब हसे (वय २७,रा.वॉर्ड नं.२,श्रीरामपूर) हे दि. ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ०८:०० वा.सुमारास त्यांचे मित्र कमलेश उत्तम पवार, योगेश जगधने असे दारू पिऊन मित्राचे घरी बसले होते.त्यावेळी विजय उर्फ टम्या गुलाब अडागळे याने कमलेश पवार यास फोन केला व त्यांचेत फोनवरून एकमेकास शिवीगाळ केली.त्यानंतर रात्री १२:३० वा.दरम्यान फिर्यादी व कमलेश पवार पुन्हा दारू विकत घेण्यासाठी मोटार सायकलवरून जात असताना विजय उर्फ टम्या अडागळे व इतर दोन अनोळखी इसमांनी आयकॉन कॉम्प्युटरच्या मागील कॉलनी येथे त्यांना आडवून त्यांचेवर लोखंडी रॉड व चाकुने हल्ला केला.त्यात कमलेश उत्तम पवार यास जबर दुखापत होऊन त्यात तो मयत झाला.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं 1069/2024 बीएनएस कलम 103, 126, 324 (4), 352 (3) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.गुन्हा घडलेबाबत प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा व पोनि/श्री. नितीन देशमुख, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांना खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन,गुन्हयातील आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात, पोलीस अंमलदार मनोज गोसावी,गणेश भिंगारदे, फुरकान शेख,संतोष खैरे,सागर ससाणे, रोहित येमुल,रमीजराजा आत्तार,रणजीत जाधव, अर्जुन बडे,उमाकांत गावडे व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि/देशमुख,पोसई/समाधान सोळंके व पोलीस अंमलदार संभाजी खरात,अमोल गायकवाड,धनंजय वाघमारे,लाला पटेल अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. वरील पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन, तांत्रीक विश्लेषण व आसपासचे सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी निष्पन्न केले. निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत गुन्हयातील आरोपीची माहिती काढुन,आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना श्रीरामपूर शहरामधुन ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) विजय उर्फ टम्या गुलाब अडागळे, वय ३२, रा.वॉर्ड नं.६, श्रीरामपूर व २) तौफीक आयुब पठाण, वय २९, रा.वॉर्ड नं.१, श्रीरामपूर जि.अहिल्यानगर असे सांगीतले.ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments