अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणी दोघांना अटक पोलीस प्रशासनाने २४ तासांच्या आत केले आरोपींना गजाआड मुक्ताईनगर प्रतिनिधी :- मोहस...
अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणी दोघांना अटक
पोलीस प्रशासनाने २४ तासांच्या आत केले आरोपींना गजाआड
मुक्ताईनगर प्रतिनिधी :- मोहसीन मुबारक तडवी
(संपादक हेमकांत गायकवाड)
काल दि ५, रोजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत हनुमान मंदिरात प्रचार नारळ फोडून प्रचारास प्रारंभ केला होता त्या दरम्यान मुक्ताईनगर-बोदवड मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील राजूर गावांमध्ये प्रचार फेरी सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या वाहनावर गोळीबार केल्याचे या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह बोदवड तालुक्यात मोठी खळबळ उडालेली आहे.
या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही.सदर घटनेची कायदेशीर तक्रार विनोद सोनवणे यांनी दिली होती दरम्यान, घटनेनंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासह जळगांव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील ४९ उमेदवारांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले तर घडलेल्या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी उप अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर एसडीपीओ राजकुमार शिंदे पोलीस प्रशासनाने तातडीने तपास चक्रे फिरवली व २४ तासांच्या आत गोळीबार प्रकरणातील दिपक दादाराव शेजोळे (रा.येवती ता.बोदवड) व आयुष उर्फ चिकु गणेश पालवे (रा. नांदगाव ता. बोदवड) या दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापर केलेली मोटर सायकल, गावठी कट्टा व काडतुस आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे बोदवड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी सांगितले
No comments