Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबर !

 सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबर ! डाकघरामार्फत दिली जात आहे जीवन प्रमाणपत्राची सुविधा भुसावळ प्रतिनिधी (संपादक :-हेमकांत गायकवाड) इंडिया...

 सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी खुशखबर !

डाकघरामार्फत दिली जात आहे जीवन प्रमाणपत्राची सुविधा


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेच्या माध्यमातून भुसावळ डाक विभागामार्फत “घरपोच” जीवन प्रमाणपत्र (डिजिटल जीवन प्रमाणपत्र / हयातीचा दाखला) सुविधा सुरू केली आहे. विशेषत: सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनर त्यांच्या पोस्टमन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात. याशिवाय 'Postinfo' अॅ प डाउनलोड करून त्यामध्ये 'Service Request' हा पर्याय वापरुन त्यांची जीवन प्रमाणसाठीची विनंती नोंदवू शकतात. या विनंतीप्रमाणे पोस्टमन पेन्शनर च्या घरी येवून आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे  जीवन प्रमाणपत्र जारी करेल. पेन्शनर पोस्ट ऑफिसचा ग्राहक असणे आवश्यक नाही. डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढताना पेन्शनरकडे खालील माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे-

१. पेन्शनचा प्रकार उदा. सर्विस पेन्शन, फॅमिली पेन्शन इ.

२. पेन्शन कुठल्या विभागाची आहे याची माहिती

३. पेन्शन मिळणार्याि बँक/पोस्ट ऑफिसचे नाव

४. पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक

५. पेन्शन ज्या बँक/पोस्ट ऑफिस खात्यात जमा होते तो खाते क्रमांक

६. मोबाइल नंबर

७. आधार क्रमांक या व्यतिरिक्त, निवृत्तीवेतनधारकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याचा / तिचा आधार क्रमांक पीपीओशी जोडला आहे आणि पेन्शन वितरण करणारी संस्था जीवन प्रमाण डिजिटल स्वरूपात स्वीकारत आहे. जीवन प्रमाणपत्र शुल्क रु 70/- आहे. चला तर.. यावर्षीपासून आपले जीवनप्रमाण घरबसल्या, सुलभ व सुरक्षित पद्धतीने जमा करा!या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त पेन्शन धारकांना घ्यावा असे आवाहन श्री एम.एस.नवलू, डाक अधीक्षक भुसावळ यांचेकडून करण्यात येत आहे.



No comments