मौजे तामसाळा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ निकाल लावा . अन्यथा तीव्र आंदोलन करू ..... जगदीश मानवतकर ...... वाशीम प्रतिनिधी ...
मौजे तामसाळा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ निकाल लावा .
अन्यथा तीव्र आंदोलन करू ..... जगदीश मानवतकर ......
वाशीम प्रतिनिधी
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
मौजे तामसाळा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या चार ते पाच महिन्यापासून भेडसावत आहे. त्यामुळे तामसाळा येथील 200 ग्रामस्थ महिला आणि पुरुष यांनी जिल्हा परिषद वाशिम येथे येऊन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा . या प्रकारची विनंती निवेदनानाद्वारे वाशिम जिल्हा परिषदचे सीओ वैभव वाघमारे साहेबांना केली. यावेळी वैभव वाघमारे साहेबांनी तात्काळ बिडीओ यांना बोलावून घेऊन या प्रकरणात लक्ष घाला आणि त्या गावचे ग्रामसेवक लांडगे यांची चौकशी करा अशा प्रकारची सूचना वैभव वाघमारे साहेबांनी केली.
या प्रकरणात बहुजन भारत पार्टी राज्यसचिव तथा ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी लक्ष घालून या प्रकरणात उडी घेतली आहे. या अगोदरही या प्रकरणात जगदीश मानवतकर यांनी लक्ष घातले होते आणि ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करून दिली होती. परंतु गावात पिण्याचे पाणी चार दिवस आले . त्यानंतर पाणी बंद झाले असा आरोप तामसाळा येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात सीओ साहेबांनी लक्ष द्यावे आणि गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवावा असे विनंती जगदीश मानवतकर यांनी केली. हे प्रकरण तामसाळा येथील रहिवासी तथा बहुजन भारत पार्टीचे जिल्हाध्यक्ष ऑटो संघटना दीपक हजबे यांनी उघडकीस आणले असून या प्रकरणात दीपक हजबे यांनी महत्त्वाची पुरावे गोळा केली आहेत .
सध्या ते त्यावर काम करत आहेत. तरी या प्रकरणात जगदीश मानवतकर यांनी लक्ष घालून जेवढे शक्य होईल तेवढ मदत करण्याचे आश्वासन जगदीश मानवतकर यांनी दिले आहे. गावात डीपी नसल्याने आम्ही पाणी देऊ शकत नाही असे उत्तर ग्रामसेवक लांडगे यांनी देताच ताबडतोब जगदीश मानवतकर यांनी एम.एस.सी.बी चे साबळे यांना फोन करून प्रकरण सांगितले त्यांनी तात्काळ लाईटची व्यवस्था करण्यात येईल आणि गावात पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन एम.एस.ई.बी चे अधिकारी साबळे यांनी दिले. या प्रकरणात महिलांना आणि पुरुषांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामपंचायतचे कर्मचारी तथा जिल्हा परिषद संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी केली जगदीश मानवतकर यांनी निवेदनाद्वारे केलीली आहे. यावेळी गावातील सर्वच स्त्रियां पुरुष यांची बहु संख्येने उपस्थिती होती.
No comments