शासकिय कन्या आश्रम शाळा येथे सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखू मुक्ती अभियान संपन्न सलाम मुबंईच्या वतीने आधार संस्थेचें हितेंद्र माळी,निशांत कोळ...
शासकिय कन्या आश्रम शाळा येथे सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखू मुक्ती अभियान संपन्न
सलाम मुबंईच्या वतीने आधार संस्थेचें हितेंद्र माळी,निशांत कोळी,शिवा बारेला,प्रिती
बारेला
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे प्रथम शाळेतील मुख्याध्यापक व शाळेतील संपूर्ण स्टाफच्या कर्मचारी यांना आपल्या सलाम मुंबई फाउंडेशन बाबत संपूर्ण माहिती दिली व संवाद साधला.सलाम मुंबई फाउंडेशन मध्ये तंबाखू मुक्ती अभियान बद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली.त्या ठिकाणी १० वी,१२ वी च्या विध्यार्थीनी उपस्थित होत्या.तेथील विध्यार्थीनी तंबाखू मुळे आपल्या शरिरावर काय परिणाम होतात.त्या बदल त्यांना माहिती सांगितली.तंबाखूच्या धुरातील लहान कण तुमच्या घशात आणि फुफ्फुसांना त्रास देतात आणि 'धूम्रपान करणाऱ्यांचा खोकला'होतो.यामुळे तुम्हाला जास्त श्लेष्मा निर्माण होतो आणि फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होते.अमोनिया आणि फॉर्मल्डिहाइड तुमचे डोळे,नाक आणि घसा यांना त्रास देतात.कर्करोगास कारणीभूत रसायने तुमच्या पेशींची वाढ जलद किंवा असामान्यपणे करतात- ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी होऊ शकतात.आपल्या आजूबाजूला परिसरात असणाऱ्या लोकांना तंबाखू च्या व्यसणं पासून दूर राहावे व आपण हि कुठंल्याही व्यसनं लावून घेऊ नये असे सांगण्यात आले व विध्यार्थीनी हि जनजागृती आपल्या परिवारात करावी सांगन्यात आले.

No comments