वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांची गांजा तस्करांन विरुद्ध कारवाई चोपडा प्रतिनिधी (संपादक :-हेमकांत गायकवाड) दि.११.११.२०२४ रोजी ...
वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांची गांजा तस्करांन विरुद्ध कारवाई
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
| दि.११.११.२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन एस एस टी पॉईंट वैजापुर येथे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करते वेळी चोपडा आगाराची बस क्र.एमएच-१४- बिटी-१३२३ धवली-चोपडा या बसची तपासणी केली असता सर्वात शेवटी मागच्या सीटवर बसलेल्या व्यंक्तीकडे असलेल्या बॅगांची तपासणी केली असता एका बॅगेत अम्ली पदार्थ (गांजा) मिळून आला. संशयीत इसमास मुदेदमालासह ताब्यात घेवून चौकशी केली असता ९.५०० किलो ग्रॅम माल किंमत १,९०,०००/- (एक लाख नव्वद हजार रुपये) एवढा किंमतीचा गांजा मिळून आला. घटनास्थळी इ-साक्ष सॉफटवेअर प्रणालीमध्ये पंचनामा व इतर कार्यवाही नोंदविण्यांत आली असून आरोपींस मुददेमालासह पोलीस निरीक्षक,(ग्रामीण) चोपडा यांनी एनडीपीएस २० (ब),२२ प्रमाणे ताब्यात घेतले.सदरची कार्यवाही जमीर शेख,उपवनसंरक्षक,यावल वनविभाग जळगांव,प्रथमेश वि.हाडपे,सहाय्यक वनसंरक्षक(वनीकरण वन्यजीव)चोपडा,समाधान पाटील,सहाय्यक वनसंरक्षक(प्रादेशिक व कॅम्पा)यावल व समाधान एम.सोनवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर(प्रा)यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(ग्रामीण)चोपडा कावेरी कमलाकर,के.वाय.शेख,वनपाल खा-यापाडाव,जितेंद्र वसंतरावर सनेर,कृषि पर्यवेक्षक तथा पथक प्रमुख एस.एस.टी.पॉइंट वैजापुर,वंदना टी.बारेला,वनरक्षक,धनाबाई एस.बारेला,वनरक्षक,ज्योती जे.बारेला वनरक्षक फिरोज तडवी,संजय धनगर,पोलीस हवालदार व खा-यापाडाव परिमंडळातील वनसेवक पुनमचंद पावरा व शांताराम पावरा आदिंनी केली. सदरची कारवाई स्थळी हेकॉ फिरोज तडवी,संजय धनगर, कृषीपर्यवेक्षक तथा पथक प्रमुख एस एस टी पथक जितेंद्र सनेर,वनपाल खाऱ्यापाडाव खलील शेख,वनरक्षक खाऱ्यापाडाव (दक्षिण) वंदना बारेला,वनरक्षक- गोमाल धनाबई भादले,वनरक्षक-मुळ्याउतर ज्योती बारेला आदी उपस्थित होते |


No comments