Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट स्कूल फॉर फ्युचरिस्टिक एज्युकेशनल अवॉर्डने सन्मानित

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट स्कूल फॉर फ्युचरिस्टिक एज्युकेशनल अवॉर्डने सन्मानित शामसुंदर सोनवणे ...

 स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट स्कूल फॉर फ्युचरिस्टिक एज्युकेशनल अवॉर्डने सन्मानित


शामसुंदर सोनवणे वि.प्र.

संपादक हेमकांत गायकवाड 

मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व. निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट स्कूल फॉर फ्युचरिस्टिक एज्युकेशनल अवॉर्डने सन्मानित. रंगोत्सव सेलिब्रेशन फाउंडेशन ऑफ मुंबई १९४८ पासून संचलित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला क्षेत्रातील विविध स्पर्धांचे आयोजन या संस्थेद्वारे देशातील बहुसंख्य शाळेतील विद्यार्थ्यांकरिता करीत असते अशा नावलौकिक व प्रतिष्ठित प्रतिष्ठाना तर्फे सलग दोन वेळा शाळेला अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सन्मानांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. यावर्षी शाळेला बेस्ट स्कूल फॉर फ्युचरिस्टिक एज्युकेशन्स अवॉर्ड तर शाळेच्या सचिव श्रीमती रक्षाताई खडसे केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण भारत सरकार यांना एज्युकेशनल रिफॉर्मर अवॉर्ड ने तर शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर यांना रिमार्क केबल कंट्रीब्यूशन इन आर्ट अँड एज्युकेशन अवॉर्डने तर शाळेचे कला तथा संगीत शिक्षक अमोल सुतार यांना कला ललित पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा ही नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे तथा समाज उपयोगी देश हितार्थ कार्यक्षम नवोदयोन्मुख नागरिक निर्मिती करिता सदैव कार्यतत्पर, अविरत प्रयत्नशील असते.


शाळेत विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला चालना देणारे, प्रेरित करणारे अगणित कार्यक्रम विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून घेतले जातात म्हणून बहुसंख्य विद्यार्थी व पालक यांच्या पहिल्या पसंतीची ही शाळा होय. यंदा घेतल्या गेलेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन फाउंडेशन अंतर्गत विविध चित्रकला स्पर्धांमध्ये तथा अखिल भारतीय राष्ट्रभाषा परिषद मुंबई द्वारा घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये शाळेतील जवळजवळ शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक व्ही के वडस्कर कलाशिक्षक अमोल सुतार हिंदी विभाग प्रमुख ज्योती पाटील मॅडम तथा सर्व शिक्षकांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली विविध बक्षिसे स्मृतिचिन्हे,पारितोषिके पटकावलीतयात शंभरा पैकी ७० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल तर उत्कृष्ट अशी बक्षिसे त्यांनी मिळवलेली असून यात इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी परिधी हर्षल झोपे , इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी अनुष्का रवींद्र बोंबले, इयत्ता दुसरीचा विद्यार्थी वेदांत सतीश गायकवाड, इयत्ता पाचवीचा विद्यार्थी रितेश राजेंद्र भोई, इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अक्षरा शामराव कोळी यांनी तथा इयत्ता ज्युनिअर के जी ते इयत्ता नववी पर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता झालेली असून या सर्वांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शाळेच्या सरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे तर जयेश स्वप्निल खोले इयत्ता सातवी याला अखिल भारतीय राष्ट्रभाषा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल तर मुख्याध्यापकांना व हिंदी विभाग प्रमुख ज्योती पाटील मॅडम यांना अखिल भारतीय राष्ट्रभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेत आयोजित कार्यक्रमांतर्गत तथा पालक व शिक्षक सभेचे औचित्य साधत या सर्व प्रतिभा संपन्न विद्यार्थ्यांना तथा त्यांच्या पालकांना शाळेतर्फे सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विषयाचे सहशिक्षक सतीश गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप स्वप्नील सुधाकर चौधरी यांच्या शब्दसुमनांनी झाला.

No comments