प्रहार जनशक्ती पक्ष वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर -:- सद्या थंडीचे दिवस असून, सर्वस...
प्रहार जनशक्ती पक्ष वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर -:- सद्या थंडीचे दिवस असून, सर्वसामान्य व्यक्ती आपली थंडी उबदार कपडे घालून कमी करू शकतो. मात्र जे वंचित आहेत, गोरगरीब आहेत त्यांना पोटाची खळगी भरतानाच अडचण येते, तर त्यांनी गरम कपडे कधी आणि कसे खरेदी करायचे? अशा वंचितांना आधार देण्यासाठी, त्यांची थंडी काहीअंशी कमी करण्याचा प्रयत्नातून उबदार ब्लँकेटचे वितरण प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहीते, संपर्क प्रमुख गजानन लोखंडकार, उपजिल्हाप्रमुख अजय टप यांचे पुढाकारातून आज २९ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध रस्त्यांवर तसेच जुन्या कॉटनमार्वेâट परिसरात, रेल्वे स्थानक परिसरात वास्तव्य करणार्या गोरगरीबांना थंडीच्या दिवस पाहता ब्लँकटचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप, प्रा.संजय पाटील सर, पत्रकार हरिभाऊ गोसावी, ओम शांती सेवा समितीचे सचिन भंसाली, प्रहार महिला आघाडीच्या सौ.उषा मानकर, शहर उपाध्यक्ष बलराम बावस्कर, करण शिरसवाल, शिवाजी भगत, अशोक गाढवे, निलेश चोपडे, दिलिप लेणेकर, मलकापूर रक्तदाता प्रतिष्ठानचे अपरेशराजे तुपकरी यांची उपस्थिती होती.
No comments