आम्ही मतदान केले, तुम्हीही करा... प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) चोपडा विधानसभा ...
आम्ही मतदान केले, तुम्हीही करा...
प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. यातच आपला खारीचा वाटा असावा म्हणून आपल्या टपाली मतदानाचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नोडल अधिकारी नरेंद्र सोनवणे व नायब तहसीलदार जळगाव जोशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.. त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. आम्ही मतदान केले आपणही कराच हा संदेश देत त्यांनी मतदारांना प्रेरित केले.

No comments