adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरला आज पांडुरंगाचा रथोत्सव

  फैजपूरला आज पांडुरंगाचा रथोत्सव इदू पिंजारी फैजपूर (संपादक :-हेमकांत गायकवाड) साक्षात स्वयंभू पांडुरंग रथोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला शुक्र...

 फैजपूरला आज पांडुरंगाचा रथोत्सव


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

साक्षात स्वयंभू पांडुरंग रथोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेला शुक्रवारी दिनांक १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे यंदाच्या रथोउत्सवाचे हे १७६ वे वर्षे आहे खुशाल महाराज देवस्थान तर्फे रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे रथोत्सवात साक्षात स्वयंभू पांडुरंग रथावर विराजमान होऊन भक्तांच्या भेटीला येत असतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे शहरात परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे रथ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत शुक्रवारी दुपारी तीनला रथोत्सवाचे मानकरी डॉक्टर अमित हिवराळे व डॉक्टर मृणालिनी हिवराळे यांच्या हस्ते महापूजा होईल शहरात परिसरातील संत महंत वारकरी टाळकरी इस्कॉन भक्त मंडळ उपस्थित राहतील रथाची मिरवणूक दुपारी तीन ला रथ गल्लीतून सुरू होईल तेथून लक्कड पेठ कासार गल्ली सुभाष चौक खुशाल भाऊ रोड जुने मुलींचे हायस्कूल ब्राह्मण गल्ली या मार्गाने जाऊन रथ गल्लीत सांगता होईल दि. १६ सायंकाळी सहा ते रात्री १० तर रविवारी दि. १७ दुपारी चार ते सायंकाळी सात पर्यंत पालखी मिरवणूक निघेल गुरुवारी दि. २१ सकाळी ९  ते ११ या वेळात मुक्ताईनगर येथील भाऊराज महाराजांचे काल्याचे किर्तन होणार आहे यावेळी महाप्रसादाचेही वाटप होईल प्रथम उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देवस्थानाचे गादीपती प्रवीण दास महाराज व मिथिलेश महाराज यांनी केले आहे.

No comments