चोपडा येथील मुमुक्षु जिनल बेन यांची संयमदीक्षा आचार्य कवींद्र सागरसुरीश्वरजी यांचे मुखारविंदने संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
चोपडा येथील मुमुक्षु जिनल बेन यांची संयमदीक्षा आचार्य कवींद्र सागरसुरीश्वरजी यांचे मुखारविंदने संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
11 डिसेंबर रोजी चाळीसगाव येथील शा. शिवजी तेजपाल कंपाऊंड येथे चोपडा क.द.ओ मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र व दिपाली बेन लोडाया यांची सुपुत्री मुमुक्षु जिनल बेन यांची संयमदीक्षा तीन दिवसीय कार्यक्रमानंतर भक्तिमय व उल्हासमय वातावरणात सानंद संपन्न झाली
अचलगच्छ संप्रदायचे प पू आचार्य भगवन कवींद्रसागरसुरीश्वरजी यांचे मुखारविंदने व प पू कल्पतरू सागरजी तसेच साध्वी भगवन, महाप्रज्ञाश्रीजी, विजयपूर्णा श्रीजी, जयदर्शिताश्रीजी, यांचे सानिध्यात दीक्षार्थी चे धार्मिक विधी सह दीक्षा प्रदान केली
मुमुक्षु जिनल बेन ह्या संयमी जीवन अंगीकार केल्यानंतर
खान्देशरत्ना प.पू जयदर्शिताश्रीजी व हिमांशू श्रीजी म. सा यांचे सुशिष्या म्हणून त्या जैन धर्माच्या सेवा करतील
दीक्षा ग्रहण केल्यानंतर त्यांचे नामकरण नूतन साध्वी जिनाज्ञांशुश्रीजी म सा असे करण्यात आले
त्यांचे दीक्षा निमित्त चोपडा, चाळीसगाव मलकापूर खामगाव मुंबई पुणे छत्तीसगड , दोंडाईचा धुळे जळगाव पाचोरा कच्छ येथील जैन धर्मीय अनुयायी हजारोच्या संख्येने उपस्थित होते चाळीसगावचे नवनिर्वाचित आमदार मंगेश दादा चव्हाण यांची कार्यक्रमास खास उपस्थिती होती
विधीकार मुंबईचे श्रेणिकभाई यांनी दीक्षा ची विधी संपन्न केली
चाळीसगावचे कच्छीदशा महाजन समाजाचे नवयुवक मंडळ, पद्मप्रभू मंदिर चे ट्रस्टी, ओसवाल जैन मूर्ती पूजक संघ चाळीसगाव चे सदस्य यांनी सर्व भाविकांसाठी अतिशय सुंदर व्यवस्था ठेवली होती

No comments