फैजपूर नगरपालिकेत मनमानी कारभार तक्रारीचे निवेदन सादर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर नगरपालिका गेल्या काही काळात जन...
फैजपूर नगरपालिकेत मनमानी कारभार तक्रारीचे निवेदन सादर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिका गेल्या काही काळात जनसामान्यांच्या मूलभूत असुविधेमुळे समस्यांनी ग्रासले आहेत नगरपालिका प्रशासनाचे कामकाज पद्धतीचा अक्षरश: हम करेसो कायदा! ठेकेदारी पद्धतीने मनमानी कारभार होतोय यास शहरवासीय मोठया प्रमाणात चिंतीत होवून वैतागले आहेत
त्याच्या तक्रारीचे निरसन तर होतच नाही पण तक्रारी होऊच नये म्हणून मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यांचा प्रत्यय असाकी पाणी पुरवठा विभागाचा पूर्व सूचना होत असलेला भोंगा गेल्या कोरोना काळापासून जाणून बुजून बंद करण्यात आलेला असून तो अद्यापही बंद च आहे याकडे कोणाचे लक्ष कां आणि कश्यासाठी गेले नाही कां जाणूनबुजून दुर्लक्षितपणा केला जात आहे? या जटिल प्रश्नांबाबत रामराज्य सेवाभावी संघाने एका लेखी निवेदनद्वारे सर्वांचेच लक्ष वेधले आहे सदर निवेदन मुख्याधिकारी यांचे अनुपस्थितीमुळे नगरपालिका प्रशासन ओ.एस. माधव कुटे व संगीता बाक्षे यांनी निवेदन स्वीकारले
सदर निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी व हुतात्मा दिनी १२:०० वाजता दोन वेळा भोंगा वाजवून शहरवासीय आदरांजली अर्पित असत मात्र सदर भोंगा बंद असल्याने यामुळे एक प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्र शहीद यांचा ही अवमानाकडे प्रशासनाचे लक्ष कां वेधले गेले नाही यातील दोषीवर दंडित कार्यवाही होणार कां?
बंद भोंगा पूर्ववत चालू व्हावा, शहरातील पाणी पुरवठा नित्यनियमाने वेळेवर व्हावा, तसेच शिव कॉलनी तील काही भागातील पाणी पुरवठ्याची समस्या तात्काळ मार्गी लागावी अशी मागणी करण्यात आली आहे सदरील निवेदनाच्या प्रति माहितीसाठी नपा प्रशासक तथा प्रांतधिकारी फैजपूर, जिल्हाधिकारी जळगाव, आमदार अमोल जावळे यांना रवाना केल्या आहेत
सदर निवेदन देतांना संजय सराफ, युवराज चौधरी, मृणाली राणे, अनुराधा परदेशी, उर्मिला परदेशी, दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन सह मान्यवर उपस्थित होते

No comments