रक्तदान कार्यात निस्वार्थी पणे गरजू रुग्णांना सेवा दिल्याबद्दल केलेल्या महान कार्याचा सत्कार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) ...
रक्तदान कार्यात निस्वार्थी पणे गरजू रुग्णांना सेवा दिल्याबद्दल केलेल्या महान कार्याचा सत्कार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भगिनी महिला मंडळ हायस्कूल चोपडा येथे दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरद पवार गट) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रक्तदान कार्यात निस्वार्थी पणे गरजू रुग्णांना सेवा दिल्याबद्दल केलेल्या महान कार्याचा सत्कार करतांना
महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्री अरुणभाई गुजराथी व माजी आमदार श्री कैलास गोरख पाटील यांच्या कडून दीपक रतिलाल जैन सीनियर क्लर्क व विशेष वसुली अधिकारी श्री महावीर नागरी सहकारी पतपेढी चोपडा हे सत्कार स्वीकारतांना त्यांनी आता पर्यंत गरजू रुग्णांन साठी आठ वर्षात एकूण १८५८२ रक्ताच्या बॅगांची मदत केलेली असून त्यांनी स्वतः त्यांचे ओ निगेटिव्ह दुर्मिळ रक्तगटाच्या रक्ताची ४८ वेळा रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविलेले आहेत व यापुढेही निस्वार्थपणे रक्ताची सेवा देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत संपूर्ण भारतात कोणालाही रक्ताची गरज भासल्यास त्यांच्या मोबाईल क्रमांक ९४२२३३५६३२ वर त्वरित संपर्क साधून त्यांच्या जवळ रक्ताची मागणी केल्यानंतर काही वेळेतच आपली रक्ताची व्यवस्था तात्काळ उपलब्ध करून देतील त्यांनी आजच्या स्वीकारलेला सत्कार वेगवान रक्त सेवा ग्रुपच्या सर्व महान रक्तदात्यांना समर्पित केलेला आहे
No comments