adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संबंधित बांधकाम धारकास न.प.मुख्य्याधिकाऱ्यानी नोटीस बजावून ऐका महिन्यात बांधकाम जमीनदोस्त करावे अन्यथा फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल

  संबंधित बांधकाम धारकास न.प.मुख्य्याधिकाऱ्यानी नोटीस बजावून ऐका महिन्यात बांधकाम जमीनदोस्त करावे अन्यथा फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात...

 संबंधित बांधकाम धारकास न.प.मुख्य्याधिकाऱ्यानी नोटीस बजावून ऐका महिन्यात बांधकाम जमीनदोस्त करावे अन्यथा फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल

प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या मागणीला यश



मलकापूर :-शहरातील चाळीसबिघा परिसरातील गणेशनगरस्थित हॉस्पीटलचे झालेले बांधकाम हे अवैध व न.प.ची कुठलीही परवानगी न घेता करण्यात आले असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी न.प.मुख्याधिकारी, न.प.प्रशासक तथा तहसीलदार मलकापूर यांचेकडे एका निवेदनाद्वारे २७ डिसेंबर रोजी केली होती. या निवेदनाची तात्काळ दखल घेत न.प. मुख्याधिकार्‍यांनी संबंधित बांधकाम धारकास नोटीस बजावून एका महिन्यात बांधकाम जमिनदोस्त करावे अन्यथा फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, न.प. हद्दीत येत असलेल्या चाळीसबिघा परिसरातील गणेश नगरस्थित गत् शांती आरोग्यम् हॉस्पीटलची बिल्डींग उभारण्यात आली आहे. सदर बांधकाम करतेवेळी या हॉस्पीटलच्या बांधकाम कामाबाबत न.प. मधून कुठलीही बांधकाम परवानगी घेण्यात आली नसल्याचे व आदी स्वरूपाच्या तक्रारींचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी दिले होते. या तक्रारीची तातडीने दखल घेत न.प. मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी डॉ.विकेश जैन शांती आरोग्यम् हॉस्पीटल मलकापूर यांना नोटीस बजावली आहे.

दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, मला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार आपण खाली नमूद केल्याप्रमाणे जमिनीच्या विकास कामास आरंभ केला आहे. जमिनीच्या विकासाचे काम हाती घेतले आहे, पूर्ण केले आहे किंवा जमिनीच्या वापरात बदल केला आहे. उक्त कायद्याखाली आवश्यक परवानगी न घेता सदरचे काम करण्यात आलेले आहे. सबब या नोटीसीद्वारे आपणांस कळविण्यात येते की, ही नोटीस प्राप्त झालेपासून एक महिन्याचे आत आपण सदर इमारतीचे काम जमिनदोस्त करावे. येणेप्रमाणे आपण न वागल्यास आपणाविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करणेत येईल आणि त्याचे खर्चाची आणि परिणामांची जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी.

जमिनीचा तपशील तसेच अनधिकृत विकासाचा तपशीलामध्ये तळमजला, पहीला मजला आणि दुसर्‍या मजल्याचे बांधकाम केले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

No comments