न्हावी येथे ग्राम स्वराज्य अभियान प्रशिक्षण आराखडा अंतर्गत गणस्तरीय कार्यशाळा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) न्हावी येथील ...
न्हावी येथे ग्राम स्वराज्य अभियान प्रशिक्षण आराखडा अंतर्गत गणस्तरीय कार्यशाळा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान प्रशिक्षण आराखडा सन २०२४-२०२५ अंतर्गत तालुका व गणस्थरावरील जीपीडीपी/ बीपीडीपी / डीपी डीपी ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधी उपक्रम क्रमांक चार अन्वये गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतेच यावलचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदिम पिंजारी, ग्रामपंचायत अधिकारी संजीव चौधरी उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये अध्यक्षीय स्थानावरून गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार शंभर टक्के राज्य सरकारला देणार मात्र राज्य सरकारला केंद्राने अशी एक अट घातली आहे की शंभर टक्के निधी पैकी साठ टक्के निधी केंद्र सांगेल त्या कामाला तो खर्च करावा व उर्वरित चाळीस टक्के निधी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार खर्च करायचा आहे.
सभेला ग्रामपंचायत सदस्य सौ. योगिता इंगळे, सौ. सविता गाजरे, रवींद्र तायडे, मयूर चौधरी, चेतन इंगळे,सौ. हेमांगी झोपे, सौ. पौर्णिमा पाटील, यशवंत तळेले ,शेख गफ्फार पिंजारी, फातेमा बी तडवी, सौ.स्वीटी बेंडाळे, सौ.रूपाली तायडे, नितीन इंगळे, सौ. शोभा मोरे, सौ.आरजू तडवी, तसेच जि प मराठी मुलांची व मुलींच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस , आशा वर्कर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे यांनी मानले.

No comments