adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आदिवासी मंत्र्यांना साकडे

  आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आदिवासी मंत्र्यांना साकडे (जळगाव प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड)   महारा...

 आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आदिवासी मंत्र्यांना साकडे


(जळगाव प्रतिनिधी)

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खाते वाटप नुकतेच जाहीर झाले.त्यानुरप आज आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ.अशोक उईकें हे आपल्या पहिला दौऱ्यात जळगाव,धरणगाव तालुका येथे  आले.

शासनमान्य आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष तथा राज्य कार्यकारीनी सदस्य मनोज ठाकरे यांनी त्यांना आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.आपण सभागृहात आश्रमशाळेच्या वेळेबाबत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक लक्षवेधी मांडली त्या बद्दल आभार व्यक्त केले.तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर प्रश्नासंदर्भात  प्रामुख्याने आश्रमशाळेची वेळ पूर्ववत 11 ते 5 करणे व 2005 नंतर नियुक्त तसेच दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि  इतर प्रश्नांसाठी लेखी निवेदन उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.सदर निवेदनाबाबत आपण मंत्री म्हणून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले.याकामी राज्य कार्यकारिणी सदस्य सी.डी.पाटील,धरणगाव तालुका अध्यक्ष योगेश पाटील,नितीन पाटील,सागर पवार व  व्ही.आर.पाटील यांनी काम पाहिले.

No comments