अनुष्का बोरसे हिचे नीट परिक्षेत यश अनुष्का बोरसे चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) गणपूर(ता चोपडा)ता २०: वेळोदे (ता चोपडा)...
अनुष्का बोरसे हिचे नीट परिक्षेत यश
अनुष्का बोरसे
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
गणपूर(ता चोपडा)ता २०: वेळोदे (ता चोपडा)येथील अनुष्का रमाकांत बोरसे नीट परीक्षेत ४५९ गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिचा वैजापूर(संभाजी नगर)येथील शासकीय महाविद्यालयात बी ए एम एस प्रवेश झाला आहे.
अनुष्का ही माजी सरपंच कल्पना बोरसे व चोपडा सूतगिरणीचे माजी संचालक रमाकांत लक्ष्मण बोरसे यांची मुलगी आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, शेतकी संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, सूतगिरणीचे संचालक संजय पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश रजाळे, संजय बोरसे, अनिल पाटील, किशोर पाटील ,तुकाराम पाटील, सुभाष नेरपगारे, ललित बागुल, गोपाल पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले.
No comments