बस स्थानक आवारातून ९० हजाराची सोन्याची बांगड्यांची चोरी काल्पनिक फाईल चित्र चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा बसस्थानकामध्...
बस स्थानक आवारातून ९० हजाराची सोन्याची बांगड्यांची चोरी
काल्पनिक फाईल चित्र
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना महिलेच्या हातातील ९० हजार रुपये किंमतीची जुनाट सोन्याच्या बांगड्या चोरून येण्याची घटना उघडकीला आले आहेत. याबाबत शुक्रवारी दुपारी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील रहिवासी असलेल्या अंजली अरुण पाटील वय-६३, रा. चोपडा या वृद्ध महिला चौका तील जळगाव या बसमध्ये चढत असताना त्यांच्या जवळील ९० हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरट्याने चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी बसस्थानकावर सर्वत्र शोध घेतला, परंतू चोरीला गेलेल्या सोन्याच्या बांगड्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.त्यामुळे त्यांनी अखेर चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे हे करीत आहे.
No comments