सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिन साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सदगुरु शिक्ष...
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिन साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ अनिता वानखेडे मॅडम होत्या तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ प्रतिभा पाटील डॉ जयश्री पाटील प्राध्यापक निधी शर्मा सुवर्णा अहिरे शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवातकार्यक्रमाच्या प्रास्ताविकाने करण्यात आली त्यामध्ये डॉ. जयश्री पाटील यांनी जागतिक एड्स दिनाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली .तसेच एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून का साजरा केला जातो यामागील पार्श्वभूमी वर्णन केली . तसेच डॉ . प्रतिभा पाटील ,सुवर्णा अहिरे ,निधी शर्मा यांनी सुद्धा एड्स दिनाबद्दल माहिती सांगितली
. तसेच त्यांची जाणीव जागृती होणे कसे अपेक्षित आणि गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले . त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे यांनी यांनी जागतिक एड्स दिन हा जगभर पसरलेल्या एड्स या जीव घेण्या रोगाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी जगभर साजरा केला जातो . यानिमित्ताने त्यांनी एड्स या आजारासंबंधी माहिती सांगितली तसेच ही एक सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक समस्या आहे आणि तिचा त्रास हा जगभरातील सर्व लोकांना होत असतो . म्हणून याबद्दल आपण सर्व नागरिक जागरूक असणे गरजेचे आहे .त्यामुळे लोकांमध्ये याच्याबद्दलच्या ज्या वाईट वृत्ती , प्रथा , अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत त्या कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स . प्राध्यापक सुवर्णा अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन स . प्राध्यापक निधी शर्मा यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ . अनिता वानखेडे ,डॉ .प्रतिभा पाटील ,डॉ . अनिता जावे , डॉ . जयश्री पाटील ,स . प्राध्या . सुवर्णा अहिरे , निधी शर्मा ,जयश्री शिंगाडे , पंकज वाघ , अरविंद पवार , चंद्रकांत सपकाळे व प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थी -शिक्षकांचे सहकार्य लाभले.
No comments