बहुजन समाज पाटीॅ चोपडा च्या वतीने मा तहसीलदार चोपडा व मा पोलिस निरीक्षक चोपडा शहर यांना जाहीर निषेध निवेदन देण्यात आले चोपडा प्रतिनिधी (...
बहुजन समाज पाटीॅ चोपडा च्या वतीने मा तहसीलदार चोपडा व मा पोलिस निरीक्षक चोपडा शहर यांना जाहीर निषेध निवेदन देण्यात आले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
बहुजन समाज पाटीॅ चोपडा विधानसभा कमेटीच्या वतीने परभणी येथील जागतिक ज्ञानाचे प्रतिक विश्ववंदनीय महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची व पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना सुनियोजित पध्दतीने, एका माथेफिरूच्या माध्यमातून करण्यात आली असून ही अतिशय निंदनीय, समाजाला लाजवणारी, काळीमा फासणारी घटना, आहे,हा एक देशद्रोह अपराध आहे,भारतीय संविधान हे आपल्या देशाचे.राष्ट्रीय ग्रंथ आहे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार करूण, बौध्दच नाही तर चर्मकार, मातंग, मेहतर, पेंड्यमांग, भील्ल, पावरा, तडवी, पिंजारी, वडर, धनगर, कुणबी, गुजर,कोळी, वंजारा, साडी,माळी,सुतार,लोहार, कैकाडी, कुंभार, ब्राह्मण, सिक्ख, जैन,ऐवढेच नाही तर ह्या देशातील मुस्लिम बांधवांना देखील न्याय देण्याचे काम केले,आहे,ह्या सहा हजार सातशे त्रेचाळीस ( 6743 ) जातींवरती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार आहेत,हि घटना संबंध देशाला हादरून लावणारी घटना आहे,ह्या घटनेच्या आम्ही बहुजन समाज पाटीॅ चोपडा कमेटीच्या वतीने जाहीर निषेध करतो,व अशा जातीयवादी, माथेफिरूंणा कडक शासन व्हावे,व जे आंबेडकरी तरूणांवरती, शासन प्रशासनाने, खोटे, गुन्हे,दाखल करून त्यांना फसवले जात आहे,ते खोटे गुन्हे, ताबडतोब मागे घेऊन ह्या घटना संबंधी योगरित्या चौकशी करूण अशा जातीयवाद, माथेफिरूला कडक शासन करण्यात यावे,जेणेकरून अशा घटना पून्हा होणार नाही,व यापुढील जर अशा घटना घडल्या तर आम्ही खपून घेणार नाही ,असे प्रतिपादन जि सचिव संदीप जीवन मगरे , चोपडा विधानसभाध्यक्ष सचिन अशोक बाविस्कर यांनी केले व यांच्या नेतृत्वात हे निषेधार्थ निवेदन मा चोपडा तहसीलदार, व मा जि अधिकारी यांच्या व्दारा मा राज्यपाल व मा मुख्यमंत्री यांना देण्यात आले,ह्यावेळेस, जि बीव्हीफ संयोजक अनिल गोरख वाडे,वि स सचिव मिलिंद बापुराव सोनवणे, वि स,प्रभारी अशोक अर्जुन बाविस्कर, माजी जि.महासचिव संजय पीरा अहिरे, शहर अध्यक्ष रूपचंद मोतीराम भालेराव ,मनोहर भीमराव बाविस्कर, सुनिल यशवंत अहिरे,सुकदेव बाविस्कर सर, नंदु दिलीप बाविस्कर, मनोज बाविस्कर, सुनिल सिरसाट, भुरसिंग हरी बाविस्कर, विजय बाविस्कर, तुषार सिरसाट, इत्यादी कार्यकतेॅ, पदअधिकारी उपस्थित होते

No comments