रावेर पोलिसांची धाड गावठी हातभट्टी उध्वस्त २७ हजाराची दारू केली नष्ट दोघांवर गुन्हा दाखल प्रतिनिधी / रावेर मुबारक तडवी (संपादक-:- हेमका...
रावेर पोलिसांची धाड गावठी हातभट्टी उध्वस्त २७ हजाराची दारू केली नष्ट दोघांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / रावेर मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील नेहता व दोधे गाव शिवारातील हातभट्टीच्या गावठी दारूच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकत दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.एकूण २७ हजाराची दारू नष्ट केली रावेर पोलीस स्टेशन चे हद्दीतील नेहेता व दोधे शिवारात हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळताच दोन्ही गावांतील ठिकाणी एक एक पथक पाठवून दारु निर्मिती व विक्री करणार्यावर कारवाई करण्याचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी सांगितले.त्यानुसार नेहेता व दोधे शिवारात गावठी हातभट्टीची दारूचे अड्डे असल्याचे पथकाला प्रत्यक्षदर्शी दिसून आले पोलीस पथकाने दोन्ही ठिकाणच्या गावठी हातभट्ट्या उध्वस्त करून एकूण २७ हजाराची दारू नष्ट केली आहे. याप्रकरणी हातभट्टीवर कारवाई करून दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पहिल्या गुन्ह्यात १५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून आरोपी कैलास पहानु तायडे रा. नेहते याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात १२ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून आरोपी सुपडू भिसन तायडे रा नेहते यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या आदेशाने रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जायसवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभेदार तडवी, पोलीस कर्मचारी विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे, महेश मोगरे, यांनी केली आहे.

No comments