मोफत योग व नाडी परीक्षण शिबिर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) चोपडा -सं त श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्...
मोफत योग व नाडी परीक्षण शिबिर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
चोपडा -संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेतर्फे तेली समाज मंगल कार्यालय संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरावर मोफत योग, ध्यान व नाडी परीक्षण शिबिर ठेवण्यात आलेले आहे. दिनांक २१ डिसेंबर २०२४ ते दिनांक २५ डिसेंबर २०२४ पर्यंत रोज स.०६:०० ते ०७:०० योग व ध्यान शिबिर आयोजित केले आहे. तसेच याच कालावधीत रोज सकाळी ०९:०० ते ११:०० वाजेपर्यंत मोफत नाडी परीक्षण करून मोफत आयुर्वेदिक उपचार करून मिळतील. यासाठी गोभक्त वैद्य श्री जितेंद्र जी महाराज सावेरगाव तालुका शिरपूर हे मार्गदर्शन करणार असून उपचार करणार आहेत. योग शिबिरानंतर मोफत वात, पित्त, कफ काढा वाटप होईल. गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष के. डी. चौधरी उपाध्यक्ष टी. एम. चौधरी व पदाधिकारी सदस्य यांनी केले आहे.

No comments