सरस्वती विद्यामंदिर, यावल येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न यावल प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दिनांक २५ डिसेंबर २०२४रोजी सरस्...
सरस्वती विद्यामंदिर, यावल येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
यावल प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २५ डिसेंबर २०२४रोजी सरस्वती विद्यामंदिर, यावल येथे माजी विद्यार्थी मेळावा सन १९९२ चे इयत्ता १० वी बॅचचे विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा संम्पन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक जी डी कुळकर्णी होते. कार्यक्रमाला निवृत्त जेष्ठ शिक्षक पी एस सोनवणे,माजी मुख्याध्यापक ए एम सोनवणे, पी एम फेगडे,पाटील ,संचालक बी पी वैद्य, भाऊसाहेब दीपक पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला,आपली मनोगते व्यक्त केले.उपस्थितांनाचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करीत, मागील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला प्रा. बीसी ठाकूर,एस बी चंदनकार,ए एस सूर्यवंशी,डॉ नरेंद्र महाले,ए बी शिंदे,मनीष तांबोळी,दिपक जोशी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ नरेंद्र महाले तर आभार अजय कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण शिंदे, नितीन सोनार, किरण पाटील,निलेश पाराशर,मोनी पाटील, किरण चौधरी, शैलजा तडवी, जयश्री यावलकर, भावना मंडपे व इतर माजी १९९२ वर्षातिल बॅच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

No comments