adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात साजरा

  एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात साजरा  संपादक हेमकांत गायकवाड  चोपडा - ( प्रतिनिधी ) तालुक्यातील...

 एस. एन. आर. जी. इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात साजरा 


संपादक हेमकांत गायकवाड 

चोपडा - ( प्रतिनिधी ) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस एन आर जी इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत परेड करून करण्यात आले.


खेळांना सुरुवात विद्यार्थी व शिक्षकांच्या मशाल फेरीने ज्योत पेटवून झाले. शाळेच्या प्राचार्य जेनीफर साळुंखे यांनी खेळाचे महत्व व गरज याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी के जी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजयी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले

तसेच पालकांसाठीही काही खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विजयी स्पर्धकांना संस्थेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, त्यांच्या पत्नी हर्षा गुजराथी, संस्थेचे सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, विठ्ठल पाटील, निपुण गुजराथी, डॉ. स्नेहा गुजराथी, सी. बी. निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर. पी. चौधरी, प्राचार्या जेनीफर साळुंखे, उपप्रचार्य कल्पेश साळुंखे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेहुल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments